शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

युतीतील दुरावा आणि एकोप्याला नागपुरी किनार!

By admin | Updated: December 3, 2014 00:40 IST

विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाला जशी अनेक राजकीय वादळाची पार्श्वभूमी आहे तशीच भाजप आणि सेना या मित्रपक्षांमधील दुरावा आणि एकोप्याचीसुद्धा किनार आहे. शिवसेनेची तटबंदी

चंद्रशेखर बोबडे - नागपूर विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाला जशी अनेक राजकीय वादळाची पार्श्वभूमी आहे तशीच भाजप आणि सेना या मित्रपक्षांमधील दुरावा आणि एकोप्याचीसुद्धा किनार आहे. शिवसेनेची तटबंदी तोडून भुजबळ व त्यांचे सहकारी बाहेर पडल्यावर नागपूर अधिवेशनातच भाजपने विरोधी पक्षनेतेपद पटकाविल्याने दोन्ही पक्षात दुरावा निर्माण झाला होता. आता नागपूरचे अधिवेशन सुरळीत पार पडावे म्हणून निवडणुकीत परस्परांच्या विरोधात लढलेले दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत. १९९१ च्या नागपूर हिवाळी अधिवेशन काळात छगन भुजबळ यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी विरोधी पक्षनेते पद हे शिवसेनेकडे होते व मनोहर जोशी विरोधी पक्षनेते होते. शिवसेनेत फूट पडल्याने त्यांची सदस्यसंख्या कमी झाली. हीच संधी साधून भाजपने या पदावर दावा केला आणि गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते झाले. भाजपच्या या खेळीमुळे शिवसेनेत नाराजी होती व त्यातून दुरावाही निर्माण झाला होता. मात्र गोपीनाथ मुंडे यांनी विरोधी पक्षनेता म्हणून संपूर्ण राज्य पालथे घातले व १९९५ मध्ये युतीची सत्ता आणण्यात मोठे योगदान दिले होते. त्यानंतर १५ वर्षे विरोधी पक्षात बसल्यावर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढतील असे वाटत असतानाच युती दुभंगली. दोन्ही पक्ष परस्पराशी कट्टर शत्रूप्रमाणे लढले. निवडणुकीत भाजप बहुमताचा आकडा पार करू न शकल्याने ते शिवसेनेच्या मदतीने सत्ता स्थापन करेल असे वाटत असतानाच ‘राष्ट्रवादी’च्या मदतीने शिवसेनेची कोंडी करण्याचे प्रयत्न झाले. त्यातून दोन्ही पक्षातील दुरावा आणखी वाढला. मात्र हा दुरावा संपवून दोघांमध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनच कारणीभूत ठरले. अल्पमतातील सरकार, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे होणारी टीका आणि शिवसेनेसारखा आक्रमक विरोधी पक्ष पुढे असेल तर अधिवेशनाला तोंड देणे अवघड असल्याचे लक्षात आल्यावरच भाजपने पुन्हा शिवसेनेशी मैत्रीचा हात पुढे केला. आता हे दोन्ही एकत्रितपणे अधिवेशनाला सामोरे जातील. युतीतील दुरावा आणि एकोप्याला असलेली नागपुरी किनार ही अशी आहे.