Uddhav Thackeray : मोठी बातमी! ७ ऑक्टोबरपासून राज्यातील प्रार्थनास्थळं खुली होणार; ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 08:42 PM2021-09-24T20:42:33+5:302021-09-24T21:36:05+5:30

Uddhav Thackeray All temples in Maharashtra to be reopened from 7th October : राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं ७ ऑक्टोबरपासून खुली होणार

All temples in Maharashtra to be reopened from 7th October | Uddhav Thackeray : मोठी बातमी! ७ ऑक्टोबरपासून राज्यातील प्रार्थनास्थळं खुली होणार; ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Uddhav Thackeray : मोठी बातमी! ७ ऑक्टोबरपासून राज्यातील प्रार्थनास्थळं खुली होणार; ठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

googlenewsNext

मुंबई: राज्यातील कोरोना संकट नियंत्रणात आल्यानं ठाकरे सरकारनं निर्बंध हळूहळू शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आता मंदिरं उघडण्याची घोषणादेखील करण्यात आली आहे. सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळं ७ ऑक्टोबरपासून खुली करण्यात येणार आहेत. ७ ऑक्टोबरला घटस्थापना आहे. त्यामुळेच प्रार्थनास्थळं उघडण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला आहे. Uddhav Thackeray All temples in Maharashtra to be reopened from 7th October.



नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं आजच घेतला. यानंतर भारतीय जनता पक्ष मंदिरं उघडण्यासाठी पुन्हा आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच सरकारनं मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतला आहे. 

भाजपचा खोचक टोला
अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मंदिरं खुली करण्याची सुबुद्धी सुचला, असा खोचक टोला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला. मंदिरं उघडण्याची मागणी भाजपनं सातत्यानं लावून धरली आहे. पण मुख्यमंत्री अहंकारातून सगळे निर्णय घेतात. मंदिरं उघडायचीच आहेत ना, मग त्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत का थांबतात. आजचं उघडा ना, असं भातखळकर म्हणाले. श्रावण महिना हिंदूंसाठी पवित्र असतो. तेव्हा का नाही उघडली मंदिरं? हे सरकार केवळ हिंदूंना त्रास देत आहे. मंदिरांवर लाखो लोकांचा रोजगार अवलंबून आहे. त्यांचा विचार करून हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता, असं भातखळकरांनी म्हटलं.

Read in English

Web Title: All temples in Maharashtra to be reopened from 7th October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.