शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पंचायत समित्यांचे पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 7:03 PM

अधिवेशनात मुख्यमंत्र्यांना भेटणार : मराठवाडा, विदर्भातील सभापतींची बुधवारी यवतमाळमध्ये बैठक

रूपेश उत्तरवारयवतमाळ : १४ व्या वित्त आयोगापासून पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचे अधिकार गोठविण्यात आले. सभापती, सदस्यांचे मानधनही दिले जात नाही. कामकाजाचा फंड मिळत नाही. यामुळे पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याची तयारी केली आहे. याबाबत २१ नोव्हेंबरला यवतमाळात बैठक होत असून मराठवाडा आणि विदर्भातील सभापती, उपसभापती, सदस्य उपस्थित राहणार आहे. हे सदस्य मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे सोपविण्यासाठी अधिवेशनावर धडक देणार आहेत.

याबाबत पंचायत समिती संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून सोमवारी यवतमाळ पंचायत समितीमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शिवसेनेचे उपसभापती गजानन पाटील आणि कळंब पंचायत समिती सभापती संजीवनी कासार यांच्या पुढाकारात बैठक झाली. १३ पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती तसेच इतर तीन पंचायत समितीचे सदस्य उपस्थित होते. अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे देण्यासाठी सर्वांनी तयार राहण्याचे बैठकीत सांगण्यात आले. यापूर्वी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांना पंचायत समित्यांचे अधिकार बहाल करण्यासाठी शिवसेनेचे सभापती संजय आवारी यांनी निवेदन सादर केले होते. मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर त्याविषयाची तक्रार नोंदविली होती. तरीही ठोस उपाययोजना झाल्या नाही. पंचायत समित्यांच्या सदस्यांना गावस्तरावर काम उरलेले नाही. यामुळे सदस्यांनी टोकाची भूमिका घेतली आहे. २१ नोव्हेंबरला  मराठवाडा आणि विदर्भातील सभापती यवतमाळात एकत्र येणार आहे. मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे देण्याबाबत यावेळी निर्णय घेतला जाणार आहे.

अशा आहेत मागण्या१३ व्या वित्त आयोगाप्रमाणे पंचायत समितीला निधी द्यावा. जिल्हा नियोजन समितीत सभापतींना सदस्य म्हणून घेण्यात यावे. स्थानिक स्वराज्य संस्था, विधान परिषदेच्या निवडणुकीत पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा. प्रत्येक पंचायत समिती सदस्याला विकासकामासाठी ५० लाखांचा निधी द्यावा. मनरेगा कामाच्या मंजुरीचा अधिकार पंचायत समिती सभागृहाला मिळावा. सभापती व उपसभापतींचे मानधन वाढवावे. वित्त आयोगाचे ५० टक्के नियोजन पंचायत समिती स्तरावर करण्यात यावे. पंचायत समितीच्या बैठकीत राज्य शासनाचे अधिकारी उपस्थित ठेवावे. 

या पदाधिकाऱ्यांची राजीनाम्याची तयारी नेरच्या सभापती मनिषा उमेश गोळे, यवतमाळचे सभापती एकनाथ तुमकर, पांढरकवडा सभापती इंदुताई मिसेवार, बाभूळगावचे सभापती गौतम लांडगे, राळेगाव सभापती प्रवीण कोकाटे, मारेगाव सभापती संजय आवारी, महागाव सभापती गणेश कांबळे, पुसदचे उपसभापती गणेश पागारी, झरीचे सभापती राजेश्वर गोंड्रावार, पांढरकवडा उपसभापती संतोष बोंडेवार आदींनी बैठकीत सरकारप्रती रोष नोंदवित राजीनाम्याची तयारी दर्शविली.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस