शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
4
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
5
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
6
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
7
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
8
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
9
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
10
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
11
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
12
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
13
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
14
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
15
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
16
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
17
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
18
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
19
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
20
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला - सोयबीन पीक पडले पिवळे

By admin | Updated: August 30, 2016 14:35 IST

पाण्याचा ताण पडल्याने पिके करपत असून, सोयाबीन पिवळे पडल्याने राज्यातील शेतक-यांच्या हरित स्वप्नावर पाणी फेरण्याची शक्यता निर्माण झाली आहे

- ऑनलाइन लोकमत
पिके परिपक्वतेच्या अवस्थेत असताना  पावसाने मारली प्रदिर्घ दडी
अकोला, दि. 30 - खरीप हंगामातील पीके परिपक्वतेच्या अवस्थेत असतानाच पावसाने प्रदिर्घ दडी मारली. पाण्याचा ताण पडल्याने पिके करपत असून, सोयाबीन पिवळे पडल्याने राज्यातील शेतक-यांच्या हरित स्वप्नावर पाणी फेरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
यावर्षी वेळेवर पावसाचे आगमन झाल्याने पेरण्यांना हा पाऊस पोषक ठरला. जूलै-ऑगस्ट महिन्यातच पावसाने जवळपास सरासरी गाठली. पिकांची वाढही जोमदार झाली पण पिके परिपक्वतेच्या अवस्थेत आली असतानाच पावसाने प्रदिर्घ दडी मारल्याने खरीप पिकांवर दुष्परिणाम होत असून, सोयाबीनचे पीक अनेक ठिकाणी पिवळी पडली आहे.
 
पश्चिम विदर्भातील ३२ लाख हेक्टरपैकी साडे चौदा लाख हेक्टरवर यावर्षी सोयाबीनची पेरणी झाली आहे.  सोयाबीनचे पीक ७० टक्के शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे. ज्या शेतक-यांनी १० जुलैनंतर पेरणी केली तेथे हे पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. शेंगा धरण्याच्या अवस्थेतच पावसाने दडी मारली आहे. परिणामी, सोयाबीनच्या दाण्याचा आकार कमी राहण्याची शक्यता आहे. हलक्या जमिनीतील सोयाबीनवर अधिक परिणाम होऊ शकतो, तर भारी, काळ्या जमिनीतील शेंगांवर या तुलनेत कमी दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे.मागील तीन,चार वर्षानंतर यावर्षी सोयाबीन पीक जोमदार वाढल्याने शेतकरी आंनदीत आहे.पण पाऊस त्यांच्या आनंदावर विरजण टाकतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या मूग, उडीद काढणीला सुरुवात झाली आहे; पण पाऊसच नसल्याने मुरमाळ व हलक्या जमिनीतील मुगाच्या शेंगांमधील दाणे अपरिपक्व आहे. यावर्षी शेतक-यांनी धाडस करू न या पिकांची पेरणी केली; पण सुरुवातीला आशेचा किरण दाखवणाºया पावसाने शेतकºयांना निराश केले आहे.
 
मान्सूनपूर्व बीटी कापसाने बोंड्या धरल्या असून, इतरही बीटी कापसाला फुले आली आहेत. यावर्षी कापसाचे पीक उत्तम असल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत; पण पाण्याचा ताण सहन करण्यापलीकडे या पिकाची क्षमता संपली आहे. शेतकºयांना आता पाऊस हवा असल्याने शेतकºयांचे डोळे पुन्हा नभाकडे लागले आहेत.ज्वारी पीक सध्यातरी ताण सहन करू न या अवस्थेत आहे. तूर हे आंतरपीक आहे; पण याही पिकाला पाण्याची गरज आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरीलही सोयाबीन पिवळे पडले आहे.