शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासनाची नौटंकी

By admin | Updated: May 24, 2014 01:10 IST

१ कोटी ६६ लाखांची थकबाकी, ग्रामसेवक संकटात

अकोला जिल्‘ातील पाणीटंचाई वाढीस जिल्हा प्रशासनाचे गलथान धोरण कारणीभूत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. गतवर्षी ग्रामपंचायत, बीडीओ व पाणीपुरवठा विभागाने केलेल्या कामाचे १ कोटी ६६ लाख रुपयांचे बिल प्रलंबित असताना, नव्याने कामे करण्याच्या जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने शासकीय कर्मचारी संकटात सापडले आहेत. यंदा पाणीटंचाईची झळ अनेक गावांना बसत आहे. दिवसाआड निघणारे मोर्चे आणि जनक्षोभ लक्षात घेता जिल्हाधिकार्‍यांनी पाणीटंचाई निवारण्यासाठी कामे करा, असे आदेश दिले आहेत. या कामात कुचराई करणार्‍यांवर जिल्हाधिकारी कारवाई करणार असल्याने सरपंच व ग्रामसेवकांसह संबंधित अधिकार्‍यांची बोलती बंद झाली आहे. सन २०१२ ते २०१३ या काळात जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने ४१० गावांत पाणीटंचाई निवारण्यासाठी युद्धपातळीवर कामे करण्यात आली. यामध्ये टँकरने पाणीपुरवठा, विंधन विहीर दुरुस्ती, नळयोजना दुरुस्ती व तात्पुरती नळ योजना या कामांचा समावेश होता. गावागावांत कामे झाल्यामुळे काही प्रमाणात का होईना ग्रामस्थांची तहान भागली होती. या कामासाठी १ कोटी ६६ लाख २० हजार रुपये खर्च झालेत. हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेला सुपूर्द करायचा असतो; परंतु हा निधीच ग्रामीण पाणीपुरवठा योजनेला प्राप्त झाला नसल्याची माहिती मिळाली आहे. जिल्‘ातील सरपंच आणि ग्रामसेवकांनी अनेकदा जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले; परंतु काहीच उपयोग झाला नाही. मागील थकबाकी कायम असताना यंदा नव्याने कामे कशी करायची, असा प्रश्न आता अधिकार्‍यांना पडला आहे. पाणीटंचाई निवारण कार्यक्रमात कुचराई केल्यास प्रशासकीय स्तरावर कारवाई करण्याचे संकेत मिळाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सन २०१२ व २०१३ मध्ये कामे करताना ग्रामपंचायतींनी उधारीवर साहित्य आणून कामे केलीत. यंदा निधी नसल्यामुळे कामे कशी करायची, असा प्रश्न सरपंच व ग्रामसेवकांपुढे उभा ठाकला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळणारा निधी ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयामार्फत कामे करणार्‍या यंत्रणेला दिला जातो; परंतु आतापर्यंत एक रुपयासुद्धा मिळाला नाही, हे विशेष. तात्पुरती पुरक नळ योजनेच्या कामासाठी मोरगाव भाकरे ग्रामपंचायतला १३ लाखांचे साहित्य पुरविले होते; परंतु दोन वर्षांचा कालावधी उलटत असला तरी एक पैसाही प्राप्त झाला नाही.