शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Budget 2022: दादांचा 3.30 लाख रोजगाराचा वादा; ईव्हीसाठी पाच हजार चार्जिंग सेंटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 08:54 IST

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत एक लाखाहून अधिक उमेदवारांनी गुंतवणूक प्रस्ताव दिले आहेत. विविध बँकांनी त्यापैकी ९६२१ प्रस्ताव मंजूर केले असून, ११०० कोटी  रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मॅग्नेटिक महाराष्ट्र २ अंतर्गत राज्यात १ लाख ८९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येईल आणि त्याद्वारे ३ लाख ३० हजार जणांना रोजगार मिळेल, असा वादा अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.  

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत एक लाखाहून अधिक उमेदवारांनी गुंतवणूक प्रस्ताव दिले आहेत. विविध बँकांनी त्यापैकी ९६२१ प्रस्ताव मंजूर केले असून, ११०० कोटी  रुपयांची गुंतवणूक झाली आहे. येत्या वर्षी ३० हजारांहून अधिक स्वयंरोजगार प्रकल्पातून सुमारे एक लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होतील, असे आशादायी चित्र अर्थसंकल्पात रंगविण्यात आले आहे. 

आदिवासी औद्योगिक क्लस्टरआदिवासी समाजातील नवउद्योजकांना प्रोत्साहन व आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नाशिक जिल्ह्यांतील दिंडोरी येथे आदिवासी औद्योगिक क्लस्टर उभारण्यात येणार आहे.

नांदेडच्या खादी केंद्रासाठी २५ कोटींची तरतूदस्वातंत्र्यसैनिक स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ यांनी १९६७ मध्ये नांदेड येथे मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीची स्थापना केली. माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांनी त्यानंतर या संस्थेचा विस्तार केला. येथे तयार झालेले राष्ट्रध्वज मंत्रालयासह संपूर्ण देशात वापरले जातात. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त खादी ग्रामोद्योग केंद्राच्या या इमारतीची पुनर्बांधणी व विक्री केंद्र उभारणीसाठी २५ कोटी रुपये दिले जातील. 

२०२५ पर्यंत पाच हजार चार्जिंग सेंटरई-वाहन धोरणांतर्गत राज्यात २०२५ पर्यंत पाच हजार चार्जिंग सेंटर उभारले जातील. तोवर नवीन वाहन नोंदणीत इलेक्ट्रिक वाहनांचा हिस्सा १० टक्के व मोठ्या शहरांमधील सार्वजनिक वाहतुकीचा हिस्सा २५ टक्के असेल. 

पं. रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजनापंडिता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजना राज्यात राबविली जाईल.  कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी या योजनेत महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून  भांडवलाच्या कर्जावरील व्याजाची १०० टक्के परतफेड करण्यात येईल. 

सौर ऊर्जा प्रकल्प   मौजे कौडगाव व मौजे शिंदाळा (जि. लातूर), मौजे साक्री (जि. धुळे), वाशीम, मौजे कचराळा (जि.चंद्रपूर) आणि यवतमाळ  येथे एकूण ५७७ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येतील. याशिवाय राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा पार्क विकसित करण्यात येणार आहेत.

डॉ. आंबेडकर जीवनप्रकाश योजनाअनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील व्यक्तींच्या घरासाठी प्राधान्याने व स्वस्तात वीज जोडणी उपलब्ध करुन देण्यासाठीच्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेस ६ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ऊर्जा विभागाला आगामी आर्थिक वर्षासाठी ९९२६ कोटी रुपये दिले जातील.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट २०२२electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर