शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र 'दादा'ला उद्या अखेरचा निरोप देणार! बारामतीत होणार अजित पवारांवर अंत्यसंस्कार; पंतप्रधान मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 14:16 IST

Ajit Pawar Funeral in Baramati: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या २९ जानेवारी रोजी बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार. वाचा सविस्तर नियोजन.

Ajit Pawar Last Rites: विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर उद्या (२९ जानेवारी २०२६) त्यांच्या कर्मभूमीत म्हणजेच बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दुःखद प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या बारामतीत येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

अजित पवार यांचे पार्थिव आज संध्याकाळपर्यंत बारामतीत अंतिम दर्शनासाठी ठेवले जाण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी १० वाजेच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा निघणार असून, त्यानंतर बारामतीतील मिशन हायस्कूल मैदानावर किंवा पवार कुटुंबाच्या शेतावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. राज्य सरकारने राजकीय शोक जाहीर केला असून, अंत्यसंस्कारावेळी त्यांना 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन मानवंदना दिली जाईल.

शासकीय दुखवटा म्हणजे काय? तो कधी जाहीर करण्यात येतो? जाणून घ्या, सविस्तर.

पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची उपस्थितीअजित पवार यांचे केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांशी असलेले जवळचे संबंध सर्वश्रुत होते. त्यांच्या निधनामुळे पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केले असून, उद्या ते स्वतः बारामतीत येऊन पार्थिवाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा आणि देशातील इतर महत्त्वाचे नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बारामती शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि 'नो फ्लाय झोन' लागू करण्यात आला आहे.

बारामतीत जनसागर लोटणारआपल्या लाडक्या नेत्याचा अखेरचा निरोप घेण्यासाठी पुणे जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो कार्यकर्ते आणि नागरिक बारामतीकडे रवाना झाले आहेत. बारामतीमधील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले असून, शहरात अत्यंत शोकाकुल वातावरण आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra to bid farewell to Ajit Pawar; PM Modi to attend

Web Summary : Maharashtra mourns Ajit Pawar, who tragically died in a plane crash. His funeral, attended by PM Modi and Amit Shah, will be held in Baramati. The state observes political mourning with a 'Guard of Honour'.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामतीPlane Crashविमान दुर्घटनाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह