पैशाचे सोंग करता येत नाही, 2100 रुपये..; लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 16:38 IST2025-03-23T16:37:56+5:302025-03-23T16:38:03+5:30

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना बंद केली जाईल, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana, said we will give 2100 to all woman | पैशाचे सोंग करता येत नाही, 2100 रुपये..; लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार स्पष्टच बोलले

पैशाचे सोंग करता येत नाही, 2100 रुपये..; लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार स्पष्टच बोलले

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरू आहे. सरकार स्थापन होताच योजनेतील पैसे 1500 वरुन 2100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. अद्याप पैसे वाढवण्याबाबत कुठलीही घोषणा झालेली नाही. विधानसभेच्या अधिवेशनात सरकारने योजनेतील रक्कम वाढवणार असल्याचे म्हटले आहे, पण कधी वाढवणार? हे मात्र स्पष्ट सांगितले नाही. यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. अशातच, आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

काय म्हणाले अजित पवार
नांदेड मधील सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, शासनाच्या तिजोरीत पैसे नसल्याचे विरोधक बोलत आहेत, पण तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा 7 लाख 20 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात विविध योजनांसाठी योग्य त्या ररतुदी केल्या आहेत. माझ्या लाडक्या बहिणींसाठीही निधी उपलब्ध आहे. विरोधक, ही योजना बंद करतील असे म्हणत होते. अनेक महिला भेटल्या. त्यांनीही मला विनवले की, 1500 रुपये देता 2100 रुपये द्या. मी त्यांना नाही म्हटले नाही. 

पैशाचे सोंग करता येत नाही...
ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल, त्यावेळी तुम्हाला 2100 रुपये देणार.मी सगळा राज्याचा हिशोब केला. तुम्ही जसा तुमचा संसार करताना महिन्याचा हिशोब लावता, तसा मला राज्याच्या 13 कोटी जनतेचा 365 दिवसाचा हिशोब लावावा लागतो. शेतकऱ्यांना काय द्यायचे, कामगारांना काय द्यायचे, मागासवर्गीयांना, अल्पसंख्यांकांना काय द्यायचे, या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. सगळी सोंग करता येतात, पैशाचे सोंग करता येत नाहीत. सरकारला ही योजना चालू ठेवायची आहे, त्यामुळे यासाठी आम्ही नवीन पर्याय काढत आहोत, अशी माहिती अजित पवारांनी दिली. 

Web Title: Ajit Pawar on Ladki Bahin Yojana, said we will give 2100 to all woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.