Ajit Pawar Death: भीषण विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळेंसह संपूर्ण कुटुंब दिल्लीहून बारामतीकडे रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 11:01 IST2026-01-28T11:00:08+5:302026-01-28T11:01:10+5:30
Ajit Pawar Death in Plane Crash: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अनेक ठिकाणी अजित पवारांच्या सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभांसाठी ते आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. हे विमान बारामती विमान तळावर उतरत असतानाच हा अपघात झाला आणि ते एका शेतात कोसळले.

Ajit Pawar Death: भीषण विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू; सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळेंसह संपूर्ण कुटुंब दिल्लीहून बारामतीकडे रवाना
आज सकाळच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण ५ जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच, अजित पवार यांचे कुटुंबीय सुनेत्रा पवार आणि सुप्रियासुळे यांच्यासह दिल्लीवरून बारामतीच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दादांचे कुटुंबीय सध्या दिल्लीत होते, असे समजते.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अनेक ठिकाणी अजित पवारांच्या सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभांसाठी ते आज सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. हे विमान बारामती विमान तळावर उतरत असतानाच हा अपघात झाला आणि ते एका शेतात कोसळले.
अजित दादांचे संपूर्ण कुटुंबीय दिल्लीवरून बारामतीत आल्यानंतर, अजितपवारांना ज्या ठिकाणी नेण्यात आले आहे, तेथे जातील या अपघाताची माहिती मिळताच सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे शरद पवार यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या सहा जनपथ येथे आले होते. येथूनच संपूर्ण कुटुंब बारामतीला जायला निघाले आहे. अजित पवार हे पवार कुटुंबातील एक मोठी आणि महत्वाची व्यक्ती होती.
कोण कोण होतं विमानात? -
अपघातावेळी विमानात अजित पवारांसह, विदीप जाधव, पिंकी माळी, त्यांचे सहकारी आणि सुरक्षा रक्षक, तसेच पायलट कॅप्टन सुमित कुपूर, कॅप्टन शांभवी पाठ आदी लोक होते.