उद्या, परवा शाळांना सुट्टी? पालकांमध्ये संभ्रम, शाळांकडूनही काही मेसेज येईना; सरकारचा नेमका आदेश काय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 22:31 IST2026-01-28T22:30:27+5:302026-01-28T22:31:48+5:30
School Holiday Update Maharashtra: अजित दादांच्या निधनामुळे राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा तसेच महाविद्यालये आज अपघाताच्या दिवशी बंद ठेवण्यात आली होती.

उद्या, परवा शाळांना सुट्टी? पालकांमध्ये संभ्रम, शाळांकडूनही काही मेसेज येईना; सरकारचा नेमका आदेश काय...
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यात तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश दिले असून, संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.
अजित दादांच्या निधनामुळे राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा तसेच महाविद्यालये आज अपघाताच्या दिवशी बंद ठेवण्यात आली होती. २८ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ या काळात राज्यात अधिकृत दुखवटा पाळला जाणार आहे. म्हणजेच दुखवटा पाळून सरकारी कार्यालये २९ आणि ३० जानेवारीला सुरु राहणार आहेत. तसेच शाळाही सुरु राहणार आहेत. या काळात कोणताही सरकारी सार्वजनिक उत्सव किंवा मनोरंजन कार्यक्रम होणार नाही, असा त्याचा अर्थ आहे.
पालकामध्ये संभ्रम...
अजित पवार यांच्या निधनामुळे दुखवटा पाळण्यात येणार आहे. सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असताना राज्य सरकारने महत्वाचा खुलासा केला आहे. शिक्षण विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी राज्यातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना केवळ बुधवारी सार्वजनिक सुटी जाहीर केली होती. मात्र, सुटीची सूचना येईपर्यंत सकाळच्या सत्रातील कनिष्ठ महाविद्यालये आणि शाळांना सत्र पूर्ण करून सोडण्यात आल्या होत्या. तथापि, दुपारच्या सत्रातील शाळा सुरू झाल्यानंतर शासनाचे निर्देश सुटीची सूचना शाळांना आली. गुरुवारपासून मात्र, शाळांचे वर्ग नेहमीप्रमाणे भरतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राजकीय शोकाचे नियम:
ध्वज अर्ध्यावर: या तीन दिवसांच्या काळात राज्यातील सर्व शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील.
सरकारी कार्यक्रम रद्द: या काळात राज्य सरकारचा कोणताही अधिकृत मनोरंजन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही.
शासकीय अंत्यसंस्कार: उद्या २९ जानेवारी रोजी बारामती येथे अजित पवार यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.