Ajit Pawar Death in Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज(दि.28) सकाळी विमानअपघातात दुःखद निधन झाले. बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. यात अजितदादांसह, विमानातील सर्व पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
‘विमानात कोणताही बिघाड नव्हता’, अजित पवारांच्या विमान अपघातावर कंपनीच्या मालकाचे स्पष्टीकरण
जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज चार सभांना संबोधित करणार होते. त्यासाठी सकाळपासून त्यांची फोनवरून जोरदार संपर्क मोहीम सुरू होती. मात्र, या धावपळीच्या दरम्यान त्यांचा शेवटचा फोन कॉल नेमका कुणाला गेला होता, याची माहिती आता समोर आली आहे.
शेवटचा फोन कॉल
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातापूर्वी अजित पवार यांचा शेवटचा फोन कॉल भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना झाला होता. विमानात बसण्यापूर्वी दोघांमध्ये चर्चा झाली होती. “मी नंतर फोन करतो,” असे सांगत अजित पवार यांनी फोन ठेवला. हाच फोन त्यांचा शेवटचा ठरला. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राणाजगजीतसिंह पाटील यांच्या आत्या असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये नाते आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राणाजगजीतसिंह पाटील कुटुंबासह तात्काळ बारामतीकडे रवाना झाले.
अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ‘ब्लॅक बॉक्स’ची चर्चा; अपघाताचे कारण समोर येणार...
अपघात नेमका कसा झाला?
सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान हा अपघात झाला. अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभांना संबोधित करण्यासाठी मुंबईहून बारामतीला जात होते. बारामती धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाला. धावपट्टीवर उतरण्याऐवजी ते जवळच्या शेतात कोसळले. जमिनीवर आदळताच विमानाचे तुकडे झाले आणि आग लागली.
Web Summary : Deputy CM Ajit Pawar tragically died in a plane crash near Baramati. Before the crash, he called BJP MLA Rana Jagjitsinh Patil. The plane crashed during landing due to a technical fault, killing all five on board. Investigation underway.
Web Summary : उपमुख्यमंत्री अजित पवार का बारामती के पास विमान दुर्घटना में दुखद निधन। दुर्घटना से पहले, उन्होंने भाजपा विधायक राणा जगजीतसिंह पाटिल को फोन किया था। विमान तकनीकी खराबी के कारण लैंडिंग के दौरान दुर्घटनाग्रस्त हो गया, जिसमें सवार सभी पांच लोगों की मौत हो गई। जांच जारी है।