"जे एका भावाला नाही जमलं ते अजित दादांनी शब्दासाठी 'करून दाखवलं'!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 16:10 IST2020-07-08T16:03:47+5:302020-07-08T16:10:29+5:30
गेल्या तीन वर्षांपूर्वी मुंबईतील मनसेच्या सात नगरसेवकांनी शिवेसेनेत प्रवेश केला होता. याची आठवण करून देत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

"जे एका भावाला नाही जमलं ते अजित दादांनी शब्दासाठी 'करून दाखवलं'!"
मुंबई : अहमदनगरमधील पारनेरचे पाच नगरसेवक सध्या चांगलेच चर्चेत आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या या पाच पारनेरच्या नगरसेवकांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत घरवापसी केली आहे. यावरून भाजपाचे नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
गेल्या तीन वर्षांपूर्वी मुंबईतील मनसेच्या सात नगरसेवकांनी शिवेसेनेत प्रवेश केला होता. याची आठवण करून देत नितेश राणे यांनी आपल्याच भावाचे सात नगरसेवक फोडणाऱ्यांना या पाच जणांना परत घेताना तरी लाज वाटेल का? असा सवाल केला आहे. तसेच, जे एका भावाला नाही जमलं ते अजित दादांनी शब्दासाठी करून दाखविले, असा टोलाही नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
नितेश राणे ट्विटमध्ये म्हणाले, "आपल्याच भावाचे 7 नगरसेवक फोडणाऱ्यांना या 5 जणांना परत घेताना तरी लाज वाटेल का? जे एका भावाला नाही जमलं ते अजित दादांनी शब्दासाठी "करून दाखवले"!! जय महाराष्ट्र!!"
आपल्याच भावाचे 7 नगरसेवक फोडणाऱ्यांना या 5 जणांना परत घेताना तरी लाज वाटेल का?
— nitesh rane (@NiteshNRane) July 8, 2020
जे ऐका भावाला नाही जमल ते अजित दादांनी शब्दासाठी "करून दाखवले" !!
जय महाराष्ट्र!!
दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वी पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये झालेले हे पक्षांतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आणि त्यांनी अजित पवार यांना फोन करून नगरसेवकांना परत पाठवा, असा निरोप दिला होता.
त्यानंतर उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद नार्वेकर कामाला लागले. त्यांच्या मुत्सद्देगिरीला यश आले. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, चारच दिवसांत या नगरसेवकांनी मातोश्रीवर येऊन पुन्हा हाती शिवबंधन बांधले.
आणखी बातम्या...
CoronaVirus News : कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात; जाणून घ्या, किंमत...
हॅकर्सच्या निशाण्यावर MS Office युजर्स; ६२ देशांना केलं लक्ष्य
मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याची विरोधकांची मागणी न्यायालयाने फेटाळली - अशोक चव्हाण
"सारथीच्या उद्घाटनाची बिले थकवणाऱ्यांनी संस्था कशी चालवायची ते शिकवू नये"
'त्यांना वाटतंय तसं नाहीय', रोहित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांना चोख प्रत्युत्तर