CoronaVirus News: Covid-19 Drug Remdesivir By Cipla To Be Launched By Name Cipremi | CoronaVirus News : कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात; जाणून घ्या, किंमत...

CoronaVirus News : कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात; जाणून घ्या, किंमत...

ठळक मुद्देहेटरो ग्रुप व्यतिरिक्त प्रसिद्ध फार्मा कंपनी 'सिप्ला'ला रेमडेसिवीर तयार आणि विक्री करण्याची परवानगीही देण्यात आली होती.येत्या एक-दोन दिवसात आपले औषध बाजारात आणले जाईल, असे सिप्लाने जाहीर केले आहे.

 नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिव वाढत आहे. कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी आणखी एक औषध बाजारात येत आहे. हेटरो ग्रुप व्यतिरिक्त प्रसिद्ध फार्मा कंपनी 'सिप्ला'ला रेमडेसिवीर तयार आणि विक्री करण्याची परवानगीही देण्यात आली होती. हेटरोने आपले औषध लाँच केले आहे. तसेच, आता येत्या एक-दोन दिवसात आपले औषध बाजारात आणले जाईल, असे सिप्लाने जाहीर केले आहे. रेमडेसिवीरच्या या जेनेरिक व्हर्जनचे नाव सिप्रेमी (Cipremi) आहे. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कंपनीने सांगितले की, औषधाची पहिली बॅचही तयार आहे.

कुठे तयार होईल, किती खर्च येईल?
सिप्लाने मुंबईतील बीडीआर फार्माकडून मॅन्युफॅक्चरिंगचा करार केला आहे. त्या बदल्यात बीडीआर फार्माने तयार डोस आणि पॅकेजिंगसाठी सॉवरेन फार्माशी करार केला. सिप्लाच्या सीएफओच्या मते, हे औषध एक किंवा दोन दिवसात सुरू होणार आहे. मात्र, सध्या किती डोस तयार आहेत याबद्दल त्यांनी काहीही सांगितले नाही. अहवालानुसार, सिप्ला Cipremi नावाने औषध सुमारे ४ हजार रुपये प्रति वॉयलच्या दराने विकले जाईल. म्हणजेच हेटरो ग्रुपपेक्षा ते १४०० रुपयांनी स्वस्त असेल.

आतापर्यंत फक्त एकच कंपनी हे औषध बनवित होती
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय) कडून मान्यता मिळाल्यानंतर हेटरो ग्रुपने Covifor नावाने औषधांची निर्मिती व विक्री सुरू केली आहे. आतापर्यंत केवळ त्यांचीच औषधे पुरविली जात आहेत. कंपनीने एका वॉयलची किंमत ५४०० रुपये ठेवली आहे. आतापर्यंत केवळ 20 हजार वॉयलचा पुरवठा केला आहे. सिप्लाच्या या घोषणेमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण रेमडेसिवीरची मागणी वाढत आहे. हे औषध मध्यम ते अत्यवस्थ कोविड -१९ रुग्णांच्या उपचारासाठी मंजूर केले गेले आहे.

उत्पादन वेगाने वाढवण्याची गरज 
कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता भारतामध्ये या औषधाचे उत्पादन वेगाने वाढवण्याची गरज आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील एकूण रुग्णांची संख्या वाढून ७१९६६५ झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २०१६० आहे. सध्या कोरोनाचे २५९५५७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अशा स्थितीत औषधांचा काळेबाजार झाल्याचे वृत्त आहे. बर्‍याच ठिकाणी रेमडेसिवीरच्या एका वॉयलसाठी रूग्णांना 30 हजार ते 40 हजार रुपये मोजावे लागल्याचे दिसून आले.

सिप्‍ला की दवा Cipremi नाम से मिलेगी। (सांकेतिक फोटो)

औषधाचा पाच दिवसांचा डोस 
आरोग्य मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, रेमडेसिवीरचा डोस रूग्णांना सहा दिवसांऐवजी पाच दिवस दिला जाईल. 'क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल फॉर कोविड -१९' च्या नुसार पहिल्या दिवशी, कोरोना रूग्णाला इंजेक्शनच्या रूपात रेमडेसिवीरचे २०० एमजी डोस देणे आवश्यक असते. यानंतर, पुढील चार दिवस दररोज १००-१०० एमजी इंजेक्शन्स आवश्यक आहेत.

आणखी बातम्या...

हॅकर्सच्या निशाण्यावर MS Office युजर्स; ६२ देशांना केलं लक्ष्य

मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याची विरोधकांची मागणी न्यायालयाने फेटाळली - अशोक चव्हाण

"सारथीच्या उद्घाटनाची बिले थकवणाऱ्यांनी संस्था कशी चालवायची ते शिकवू नये"

'त्यांना वाटतंय तसं नाहीय', रोहित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांना चोख प्रत्युत्तर

घुसखोरी केली नाही, तर चिनी सैन्य माघार कशी घेत आहे? असदुद्दीन ओवेसींचा सवाल

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: Covid-19 Drug Remdesivir By Cipla To Be Launched By Name Cipremi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.