शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर मतदारसंघासाठी प्रहारला हवा भारिपचा पाठींबा

By admin | Updated: January 14, 2017 00:46 IST

बच्चू कडू यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट.

अकोला, दि. १३- प्रहारचे अमरावती येथील आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी भारिप नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन पदवीधर मतदार संघातील प्रहारचे उमेदवार प्रा.दीपक धोटे यांना पाठिंबा देण्याची विनवणी केली. दरम्यान, यासंदर्भात लवकरच दुसरी सकारात्मक बैठक होणार आहे, अशी माहिती आमदार कडू यांनी दिली. शुक्रवारी ते प्रहारचे अमरावती मतदार संघाचे उमेदवार प्रा.धोटे यांच्या प्रचारार्थ आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला . अँड. प्रकाश आंबेडकर अकोला आणि विदर्भात सातत्याने गोरगरिबांसाठी लढत आहेत, प्रहारदेखील शेतकरी आणि दीनदलितांच्या हक्कासाठी लढत आहे. त्यामुळे मित्र पक्षाची युती सोबत असावी म्हणून आम्ही अँड.आंबेडकरांना भेटलोत. त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, दुसरी सकारात्मक बैठक लवकरच होणार आहे, अशी माहितीही आ.कडू यांनी दिली. सुधीर कॉलनीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी उमेदवार प्रा.धोटे आणि प्रहारचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. विदर्भातील अनुशेषावर टीका करून सत्ता मिळविणार्‍यांना मतं मागण्याचादेखील नैतिक अधिकार नाही. किती बेरोजगारांना नोकरी दिली, किती उद्योग विदर्भात आणले, याचा जाब द्यावा लागेल, असेही ते बोललेत. बेरोजगारांना रोजगार आणि शेतकर्‍यांच्या शेतमालास भाव देण्याचे कर्तव्यही सत्ताधार्‍यांनी बजावले नाही. पदवीधरांसाठी असलेल्या निवडणुकीत बेरोजगारांचे प्रश्न उपस्थित होत नसतील तर आंदोलन म्हणून आम्ही लढू. किती मते मिळणार, असा प्रश्न त्यांना केला असता, आम्ही जिंकण्यासाठीच आहोत, असे उत्तरही त्यांनी दिले. मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. एक आमदार काय करू शकतो, हे मी दाखविले आहे. त्यामुळे प्रहारचे प्रा.धोटेदेखील खूप काही करू शकतील, जर त्यांना सुशिक्षितांनी साथ द्यावी, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरादाखल बोललेत. औरंगाबादच्या पदवीधर मतदार संघात निवडणूक लढविणार्‍या बिल्डरवरही त्यांनी येथे टीका केली. धार्मिक झेंड्याआड निवडणूक लढविण्यापेक्षा विकासाच्या मुद्दयावर निवडणूक लढविली गेली पाहिजे. घटनेत ही तरतूद असताना सर्वोच्च न्यायालयास हस्तक्षेप करावा लागतो, ही शरमेची बाब आहे, असा खेदही त्यांनी येथे व्यक्त केला. पत्रकार परिषदेला प्रहारचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.