शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पशुसंवर्धन योजनेचा लक्ष्यांक कमी, लाभार्थीच जास्त

By admin | Updated: July 31, 2015 23:23 IST

८७६ लाभार्थ्यांची होणार निवड; अमरावती विभागासाठी ११ कोटीची तरतूद.

खामगाव (बुलडाणा): पशुसंवर्धन विभागामार्फत शेळी पालन, कुक्कुट पालन व दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शासनाच्यावतीने निकषपात्र लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येते. यासाठी २0१५-१६ या वर्षात विभागातील ८६७ लाभार्थ्यांची निवड केली जाणार असून, त्याकरीता ११ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे; परंतु योजनेचा लक्ष्यांक कमी आणि लाभार्थी संख्या भरमसाठ असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील ग्रामीण भागात दुग्धोत्पादनास चालना देण्यासाठी दुधाळ संकरीत गायी, म्हशीचे वाटप, अंशत: ठाणबंद पध्दतीने संगोपन करण्यासाठी शेळी, मेंढी गट वाटप, तसेच मांसल कुक्कुट पक्षी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या नाविण्यपूर्व योजनेंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी लाभ दिला जातो. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांची यामध्ये निवड केली जाते. योजनेचा लाभ घेवू इच्छिणार्‍या अर्जदारांनी तालुकास्तरावर अर्ज सादर करणे अनिर्वाय आहे. जिल्हास्तरावर प्राप्त झालेल्या अर्जातून योग्य लाभार्थ्यांची निवड केली जाते. अनुदान तत्वावर लाभ दिला जात असला तरी निवड झालेल्या लाभार्थ्यांना स्वत:चा हिस्सा भरणा करावा लागतो. २0१५-१६ या वर्षाकरिता विभागातील अमरावती जिल्ह्यात २४२ लाभार्थी, बुलडाणा १८९, यवतमाळ २३३, अकोला १४४ तर वाशिम जिल्हयातून ९८ लाभार्थ्यांचे लक्ष्यांक आहे. लक्ष्यांक कमी असला, तरी वेगवेगळय़ा योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेकडो लाभार्थींनी अर्ज केले आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असल्याने, शेवटच्या दिवशी तालुका पशुधन विभागात अर्ज सादर करणार्‍यांची झुंबड उडाली होती. यावर्षी कागदपत्रांची पूर्तता करण्याची प्रक्रिया किचकट असल्याने लाभार्थी हैराण झाले. योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांना मार्च २0१६ अखेर लाभ मिळणार आहे.

*पशुधन विभागाकडे शेकडो फाईली

          दुधाळ जनावरे, मांसल कुक्कुट पक्षी, शेळी, मेंढी गट वाटप आदी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी शेकडो अर्जदारांनी पशुधन विभागाकडे फाईली जमा केल्या आहेत. लाभधारकांची संख्या मात्र मोजक्याच लोकांची राहणार असली तरी, लाभ मिळेल या आशेने सर्वच जण कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करतात. दरवर्षीच लक्ष्यांक कमी असल्याने लाभार्थ्यांंचा हिरमोड होतो.