शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कृषी दूत येणार शेतकर्‍यांच्या मदतीला

By admin | Updated: June 17, 2014 20:31 IST

एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा करणार प्रसार

अकोला : पिकावर येणार्‍या वेगवेगळ्या किडींमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होत असते. या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या कीटकनाशकांची फवारणी करतो; परंतु त्याचे उलटे परिणाम होतात. म्हणूनच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विदर्भातील सहा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतकर्‍यांना एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीची माहिती देण्यासाठी कृषी दूत योजना सुरू केली आहे. या योजनेला रतन टाटा ट्रस्टने अर्थसहाय्य केले आहे.विदर्भातील अकोला,बुलडाणा,वाशिम, यवतमाळ, अमरावती व वर्धा या सहा शेतकरीआत्महत्याग्रस्त जिल्ह्याचा या प्रकल्पांतर्गत समावेश करण्यात आला असून, या जिल्ह्यातील कपाशी, तूर व सोयाबीन पिकाच्या एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा जास्तीत जास्त प्रचार करू न तळागाळातील शेतकर्‍यांचा सामाजिक व आर्थिक स्थरउचावणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी नवोन्मुख विस्तार शिक्षण पद्धतीद्वारे कृषी दूतांना उत्तमरित्या प्रशिक्षण देऊन पुरेशे विषय ज्ञान अवगत करू न देण्यात येत आहे. या कृषी विद्यापीठाने आतापर्यंत १०० कृषी दूतांना प्रशिक्षण देऊन तयार केले आहे. या कृषी दूतांना एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा प्रसार करण्यासोबतच शेतकर्‍यांमध्ये क्षमता विकसित करणे, एकरी लागवड खर्च कमी करणे, कमीत कमी कृषी निविष्ठामध्ये प्रती एकर उत्पादन वाढविणे इत्यादी बाबींवर भर द्यावा लागणार आहे. या शिवाय जमीन आरोग्य व्यवस्थापन,शाश्वत शेतीकरिता पीक अवशेषाचे नियोजन, पीक फेरपालट, त्याचे फायदेव उपयुक्तता,पेरणी करताना किंवा पेरणीपूर्वी पीक संरक्षणविषयक दक्षता, रोग नियंत्रणासाठी बीजप्रक्रियेचे महत्त्व, कपाशी, तूर व सोयाबीन पिकावर येणारे रोग, क ीड व व्यवस्थापन, सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण, कीड सर्वेक्षणाच्या विविध पद्धती, किटकांचे प्रकार व त्यानुसार निर्माण होणारी नुकसानीची पातळी, कीड व्यवस्थापनातील नवीन आव्हाने व किटकनाशके फवारणीतंत्रज्ञान इत्यादी उपाययोजनेबाबत या कृषी दूतांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

** या प्रकल्पांतर्गत लाखो शेतकर्‍यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्याचे काम कृषी दूत करीत आहेत. कृषी दूतांना मार्गदर्शन करण्यासाठी क्षेत्र अधिकारी नेमण्यात आले आहेत.

** खरीप व रब्बी हंगाम सुरू होण्याअगोदर कृषी दूतांना कृषी विद्यापीठाच्या मुख्यालयी प्रशिक्षण देण्यात येते. हे कृषी दूत शेतीतंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहेत.शेतकरी उत्तम कृषी व्यवस्थापक व्हावा,त्यांच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे या प्रकल्पाच्या माध्यमातून अपेक्षित आहे.  - डॉ. विजय माहोरकर,संचालक, विस्तार शिक्षण, डॉ.पंदेकृवि,अकोला.