बलात्कारानंतर विद्यार्थिनीची चित्रफीत केली व्हायरल !

By Admin | Updated: May 26, 2017 03:18 IST2017-05-26T03:18:31+5:302017-05-26T03:18:31+5:30

वाशिममधील घटना : गुंगीचे दिले औषध

After the rape, the viral video of the girl! | बलात्कारानंतर विद्यार्थिनीची चित्रफीत केली व्हायरल !

बलात्कारानंतर विद्यार्थिनीची चित्रफीत केली व्हायरल !

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम येथे शिकत असलेल्या १९ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून त्याची चित्रफित तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल केली. याप्रकरणी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला.
पीडित युवतीच्या फिर्यादीनुसार, ती यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील एका गावची रहिवासी असून, वाशिम येथे शिक्षण घेत आहे. सदर युवतीला दिनेश गुरव पाटील (रा.सांगली) याने एक वर्षापूर्वी वाशिम येथील एका हॉटेलमध्ये बोलाविले होते. या हॉटेलमधून त्याने पीडित युवतीला दुसऱ्या हॉटेलमध्ये नेले. सदर हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिला पिण्याच्या पाण्यामध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओद्वारे त्याने पीडितेला ब्लॅकमेल केले आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
याप्रकरणी पीडित युवतीने यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली; मात्र घटनास्थळ वाशिम शहरात असल्याने महागाव पोलिसांनी सदर प्रकरण वाशिम शहर पोलिसांकडे वर्ग केले. याप्रकरणी वाशिम शहर पोलिसांनी आरोपी दिनेश गुरव पाटील याचेविरूध्द भादंविचे कलम ३७६, ५०४, ५०६ व अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला.

Web Title: After the rape, the viral video of the girl!