शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आश्रयदात्याचे सांडलेले रक्त व्यर्थ!

By admin | Updated: June 23, 2014 01:18 IST

भरन्यायालयात साक्षीदाराच्या पिंजऱ्यात साक्ष देताना खुद्द मृताची पत्नी आणि मुलगीही फितूर झाल्याने रात्रंदिवस काबाडकष्ट करून कुटुंबाचे पालन करणाऱ्या एका दुर्दैवी आश्रयदात्याचे सांडलेले रक्त

पत्नी व मुलगीही झाली फितूर : गोळी झाडणारा संशयाचा लाभ मिळून निर्दोषराहुल अवसरे - नागपूरभरन्यायालयात साक्षीदाराच्या पिंजऱ्यात साक्ष देताना खुद्द मृताची पत्नी आणि मुलगीही फितूर झाल्याने रात्रंदिवस काबाडकष्ट करून कुटुंबाचे पालन करणाऱ्या एका दुर्दैवी आश्रयदात्याचे सांडलेले रक्त व्यर्थ ठरले. खापरखेडा हद्दीतील सिल्लेवाडा वेकोलि कॅन्टीनसमोर एका पहारेदाराची देशीकट्ट्यातून गोळी झाडून हत्या करणाऱ्या आरोपीची सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ देऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली. रामकृष्णा देवराव मून (४५) रा. सिल्लेवाडा हवामहल, असे मृताचे नाव होते. भागीरथ रामस्वरूप खरग्याल (२७) रा. खापरखेडा, असे आरोपीचे नाव आहे. २७ नोव्हेंबर २०१२ च्या रात्री ९ ते २८ नोव्हेंबरच्या सकाळी ७ वाजताच्या दरम्यान खुनाची घटना घडली होती. या खटल्याची पार्श्वभूमी अशी, रामकृष्णा हा आधी खाण कामगार होता. मिरगीचा आजार जडल्याने त्याला सिल्लेवाडा वेकोलि कॅन्टीन येथे ‘वॉचमन’चे काम देण्यात आले होते. पत्नी, १९ व १७ वर्षांच्या दोन मुली आणि १२ वर्षांचा मुलगा, असे हे कुटुंब. तो एकटाच या कुटुंबाचा भार वाहत होता. एक मुलगी बी. कॉम. प्रथम वर्षाला तर दुसरी अकराव्या वर्गात शिकायची. मुलगाही आठव्या वर्गात शिकायचा. लहान मुलीचे तिच्या एका मैत्रिणीमार्फत भागीरथसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित झाले होते. भागीरथ हा विवाहित असतानाही त्याने या मुलीपासून ही बाब दडवून ठेवली होतो. खुनाच्या घटनेच्या पाच-सहा महिन्याआधीच त्याने आपल्या पत्नीला कोलकाता येथील माहेरी पाठवून दिले होते. भागीरथ हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध मौदा, रामटेक, तुमसर येथे दरोडा आणि जबरीचोरीचे गुन्हे दाखल आहेत. रामकृष्णाला आपल्या मुलीच्या प्रेमसंबंधाबाबत समजताच त्याने भागीरथ याला घरी येण्यास सक्त मनाई केली होती. मुलीलाही त्याने ताकीद दिली होती. वडिलांचा विरोध झुगारून तिचे प्रेमसंबंध सुरूच होते. २७ नोव्हेंबर २०१२ रोजी भागीरथ याने लग्नासाठी या मुलीला कोराडी देवी मंदिरात नेले होते. परंतु तेथील पंडितने वडिलांशिवाय लग्न लावण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याने या मुलीला गायमुख मंदिरात नेऊन आपल्या मित्रांच्या साक्षीने तिच्याशी विवाह केला होता.