शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २८ वर्षांनंतर दहावीचे गणित सुटले

By admin | Updated: June 10, 2015 03:09 IST

पन्नाशीचे चोगले तब्बल २८ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर दहावी उत्तीर्ण झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

मुंबई : अविनाश भालचंद्र चोगले हे मुख्यमंत्री कार्यालयातील शिपाई मंगळवारी मंत्रालयात पेढे वाटत फिरत होते. पन्नाशीचे चोगले तब्बल २८ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर दहावी उत्तीर्ण झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. प्रत्येकाच्या हातावर पेढा ठेवताना आता यापुढे आपण ‘शिपाईगिरी’ करणार नाही कारकून होणार, हे ते आवर्जून सांगत होते.चोगले हे १९८७ मध्ये सर्वात प्रथम दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्या वेळी इंग्रजी, गणित, इतिहास-भूगोल आणि हिंदी या चार विषयांत त्यांना अपयश आले. १९९० मध्ये त्यांना सार्वजनिक आरोग्य विभागात शिपायाची नोकरी लागली. आपण दहावी झालो नाही याची खंत चोगले यांना सतत जाणवायची. त्यांनी खासगी क्लास लावून मार्च व आॅक्टोबर असा परीक्षा देण्याचा सपाटा लावला. हिंदी, इतिहास-भूगोल इतकेच काय इंग्रजी हे विषय टप्प्याटप्प्याने सुटले. मात्र गणिताच्या कोड्याने चोगलेंची दहावीची वाट रोखली होती. भांडुपच्या नवजीवन विद्यामंदिरातील शिक्षक आणि आई-वडील व पत्नी यांनी चोगले यांची पाठराखण केली. घरचा मासे विक्रीचा व्यवसाय आई पाहायची. आता पंच्याहत्तरी झालेल्या आईला हा व्यवसाय करणे झेपत नाही. त्यामुळे चोगले यांच्यावर ही जबाबदारी येऊन पडली. परंतु पत्नीने ही जबाबदारी घेत आपल्या नवऱ्याला सकाळचा वेळ अभ्यास करायची उसंत दिली. कार्यालयातील फावल्या वेळात चोगले गणित सोडवायचे़ गेल्या २८ वर्षांतील प्रश्नपत्रिका त्यांनी अनेकदा सोडवल्या. पन्नाशीला आलेल्या चोगलेंनी या वेळी गणित सोडवण्याचा निर्धार केला होता. निकालाच्या अगोदर त्यांना दहावी उत्तीर्ण झाल्याचे कळले होते. तरीही धडधडत्या छातीने सोमवारी आपला निकाल पाहिला. ३८ गुण मिळवून चोगलेंचे गणित सुटले. (विशेष प्रतिनिधी)