शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

महाधिवक्ता सुनील मनोहर यांचा राजीनामा

By admin | Updated: June 10, 2015 03:03 IST

राज्याचे महाधिवक्ता अ‍ॅड. सुनील मनोहर यांनी वैयक्तिक कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत तो स्वीकारण्यात आला.

मुंबई : राज्याचे महाधिवक्ता अ‍ॅड. सुनील मनोहर यांनी वैयक्तिक कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत तो स्वीकारण्यात आला. या पदाचा अतिरिक्त कार्यभार सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपविण्यात आला आहे. भाजपा सरकार आल्यानंतर अ‍ॅड. मनोहर यांची १८ नोव्हेंबर २०१४ रोजी महाधिवक्तापदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यापूर्वी अ‍ॅड.दरियास खंबाटा हे या पदावर होते. अ‍ॅड. मनोहर यांचा गेल्या सात महिन्यांतील अनुभव अतिशय चांगला होता आणि शासनाला विधी सल्ला देण्याची चोख भूमिका त्यांनी पार पाडली, अशी भावना बहुतेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत व्यक्त केली. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून विधी पदवी संपादन केलेले मुख्यमंत्री फडणवीस यांचे मनोहर कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अ‍ॅड.व्ही.आर.मनोहर यांनी मुंबईत स्थलांतरित व्हावे म्हणजे अ‍ॅड.सुनील यांना महाधिवक्तापदाचा राजीनामा न देता वडिलांची सेवा करता येईल, असा प्रयत्नही मुख्यमंत्र्यांनी करून पाहिला होता. त्यासाठी त्यांनी अ‍ॅड.व्ही.आर.मनोहर यांची नागपुरातील निवासस्थानी जाऊन भेटही घेतली होती. परंतु वार्धक्यामुळे मुंबईत स्थलांतरित होण्यास त्यांनी असमर्थता व्यक्त केली होती. का दिला राजीनामा ?अ‍ॅड.सुनील मनोहर हे नागपूरचे प्रख्यात विधिज्ञ व्ही.आर.मनोहर यांचे पुत्र आहेत. वडिलांच्या तब्येतीची काळजी घेता यावी आणि त्यांच्यासोबत नागपूरला राहता यावे, म्हणून त्यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले जाते. सुनील यांचे बंधू अ‍ॅड.शशांक हेही निष्णात वकील असून, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आहेत.