शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘अदाएगी कुपन’सक्ती अन्यायकारक

By admin | Updated: June 7, 2015 02:07 IST

इस्लाम धर्माचा चौथा महत्त्वाचा स्तंभ म्हणजे हज. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा प्रत्येक मुस्लीम आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करतो.

अझहर शेख, नाशिकइस्लाम धर्माचा चौथा महत्त्वाचा स्तंभ म्हणजे हज. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा प्रत्येक मुस्लीम आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करतो. हज यात्रेसंबंधी भारतीय केंद्रीय हज समितीकडून प्रत्येक हज यात्रेकरूवर कुर्बानीच्या ‘अदाएगी कुपन’ची सक्ती करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, राज्य हज समितीसह विविध धार्मिक संघटनांसह उलेमांनीही याबाबत आक्षेप घेतला आहे. केंद्रीय समितीला धार्मिक बाबींमध्ये (शरियत) हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे मत धार्मिक स्तरावरून व्यक्त केले जात आहे. एकूणच राज्य व कें द्र सरकारच्या हज समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ‘कुपन वाद’ सध्या गाजत आहे.चार महिन्यांपासून केंद्रीय हज समितीकडून हज यात्रेकरूंना ‘अदाएगी कुपन’ खरेदी करणे बंधनकारक करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सरकारच्या माध्यमातून समिती याबाबत कायदा करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती राज्य हज समितीचे अध्यक्ष हाजी इब्राहिम शेख यांनी ‘लोकमत’ला दिली. यात्रेकरूंना कुर्बानी करणे धार्मिक कायद्यानुसार ऐच्छिक आहे. यामुळे हज समितीला कुर्बानीच्या नावाखाली कुपन विक्री करणे व त्याची सक्ती यात्रेकरूंवर लादण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचे धर्मगुरूंचे मत आहे. केंद्रीय हज समितीने कुपन सक्तीचा अट्टाहास न सोडल्यास धार्मिक शरियतमध्ये हा मोठा हस्तक्षेप ठरू शकतो, असे फतवे राज्यासह धार्मिक दारूलउलूम व मुफ्तींकडून प्राप्त झाल्याचे शेख यांनी सांगितले आहे.‘तेथे’ बोगस कुपन विक्री?मक्कामध्ये सौदी सरकारच्या कुर्बानीच्या अदाएगी कुपनची बोगस विक्री केली जात असल्याचे राज्याच्या हज समितीने केंद्रीय समितीच्या निदर्शनास आणून दिले. राज्य समितीच्या अध्यक्षांनी थेट तक्रार सौदी सरकारकडे करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केंद्राच्या समितीकडे केली. केंद्रीय हज समितीने सखोल चौकशी करून यात्रेकरूंना फसविणाऱ्यांना अटकाव करण्याची मागणी इब्राहिम शेख यांनी केली आहे.