शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत स्टॉलवर कारवाई

By admin | Updated: September 6, 2016 01:04 IST

गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यांवर अनधिकृतपणे थाटण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येणार

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यांवर अनधिकृतपणे थाटण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने रस्त्यावर स्टॉल लावून गॅसचा वापर करून खाद्यपदार्थ तयार करणे देखावे पाहण्यासाठी फिरणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक असल्यामुळे पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने हा निर्णय घेतला आहे.अतिक्रमण विभागप्रमुख संध्या गागरे यांनी ही माहिती दिली. उत्सवकाळात गर्दीच्या रस्त्यांवर चौकात किंवा पदपथांवरच असे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले जातात. त्यासाठी अधिकृतपणे परवानगी घेतली जात नाही. तिथे स्वयंपाकाचा गॅस वापरला जातो. मागील वर्षी एका ठिकाणी गॅस गळती होऊन आग लागली होती, सुदैवाने काहीही दुर्घटना घडली नाही. त्यामुळेच या वेळी आधीपासूनच काळजी घेण्यात येत आहे, असे गागरे यांनी सांगितले.या कारवाईसाठी चार स्वतंत्र पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला २ पोलीस निरीक्षक, ४ सहायक फौजदार व ४० पोलीस असतील. ते चार पथकांमध्ये विभागून काम करतील. शहराचे चार भाग तयार करून ते या चार पथकांना देण्यात आले आहेत. मंगळवारी सायंकाळपासूनच या कारवाईला सुरुवात करणार असल्याची माहिती गागरे यांनी दिली.प्रामुख्याने गर्दीच्या रस्त्यांवर पादचारी आणि वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या स्टॉलवर कारवाई होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. उत्सवकाळात अनेकांना व्यवसाय करण्याची इच्छा असते. त्यासाठी त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयांकडून परवानगी दिली जाते. त्याचे नियम आहेत. अशी परवानगी असलेल्या व सर्व नियमांचे पालन करणाऱ्या स्टॉलवर कारवाई होणार नाही. त्यामुळे स्टॉल लावण्यापूर्वी संबंधितांनी क्षेत्रीय कार्यालयाची परवानगी घ्यावी, असे गागरे यांनी नमूद केले. (प्रतिनिधी) >या कारवाईसाठी चार स्वतंत्र पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला २ पोलीस निरीक्षक, ४ सहायक फौजदार व ४० पोलीस असतील. ते चार पथकांमध्ये विभागून काम करतील. शहराचे चार भाग तयार करून ते या चार पथकांना देण्यात आले आहेत. प्रामुख्याने गर्दीच्या रस्त्यांवर पादचारी आणि वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या स्टॉलवर कारवाई होणार