शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विनायक मेटे यांचे अपघाती निधन, बीड येथे आज होणार अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 05:44 IST

Vinayak Mete : जखमी झालेल्या मेटे यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुंबईतील जेजे रुग्णालयात सायंकाळी मेटे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले.

वावोशी (रायगड)/नवी मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे अपघाती निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भातण बोगद्याजवळ मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. जखमी झालेल्या मेटे यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुंबईतील जेजे रुग्णालयात सायंकाळी मेटे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी बीड येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मेटे मुंबईला येत होते. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास मेटे यांच्या गाडीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. पुढे असलेल्या कंटेनरला गाडीने धडक दिली. चालकाच्या मागील सीटवर बसलेले मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.  अपघातानंतर बराच काळ ते घटनास्थळी रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते. अखेर पोलिसांना माहिती मिळताच एका रुग्णवाहिकेतून  त्यांना  कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात आणले. अपघातात मेटे यांचे अंगरक्षक राम ढोबळे हेही गंभीर जखमी झाले असून, चालक एकनाथ कदम याला किरकोळ इजा झाली. 

तासभर मदत नाही? अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही. १०० नंबरला फोन केला. मात्र, फोन उचलला नाही. मदतीसाठी मी  विनवणी करत होतो, मात्र कुणीही थांबत नसल्याने मी रस्त्यावर झोपलो. असे मेटे यांचा गाडीचालक एकनाथ कदम याने सांगितले.

विनायक मेटे यांचे निधन झाले यावर माझा विश्वास बसत नाही. मराठी आरक्षणासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. सातत्याने त्यांची तळमळ मला जाणवली. मराठा समाजाला न्याय मिळवून देणे हाच त्यांचा ध्यास होता. आरक्षणाबाबत अतिशय महत्त्वाची बैठक आम्ही ठेवली होती. मात्र, दुर्दैवाने त्यांचे अपघाती निधन झाले. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री 

मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. अतिशय संघर्षातून आयुष्य जगत, गरिबीतून दिवस काढत विनायकराव मेटे यांनी आपले आयुष्य उभे केले होते.-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री 

मराठवाड्यात एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले आणि कष्टाने स्वत:चे नेतृत्व उभे करणारे असे मेटेंचे व्यक्तिमत्त्व होते. मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न अशा सामाजिक प्रश्नांची त्यांना जाणीव होती.- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेAccidentअपघात