शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनासाठी राजकारणात प्रवेश - तारा सिंग

By admin | Updated: October 11, 2014 06:10 IST

परिवर्तन घडवायलाच हवे या उद्देशाने मी राजकारणात उडी घेतली. तेव्हापासून मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून समाजकार्य करतो आहे

राजकारणात उतरण्याचे कारण?- १९८७ मध्ये पंजाबमधील शांतता रॅलीमध्ये राजीव गांधी यांंच्या समाजसेवी चळवळीने प्रेरित झालो. तेव्हापासून आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो ही भावना माझ्यात जागृत झाली. परिवर्तन घडवायलाच हवे या उद्देशाने मी राजकारणात उडी घेतली. तेव्हापासून मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून समाजकार्य करतो आहे. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचार करत आहात?- मुलुंडमध्ये तीनशे खाटांचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, मुलुंडमध्ये सत्र न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, लघुवाद न्यायालय, जुन्या इमारतींचा २.५ ते ४ एफएसआयप्रमाणे पुनर्विकास करण्यासाठी आग्रहाची भूमिका, टोलमुक्त मुंबई, मुलुंड पूर्वेकडील हरिओमनगर येथे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडविण्यासाठी अत्याधुनिक गारबेज ट्रीटमेंट प्लांट तसेच मुलुंड-बोरीवली मोनो रेल कनेक्टिव्हिटी, ट्रॉमा सेंटरची तरतूद, पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुलुंडमध्ये शिरण्यासाठी पर्यायी मार्गाची तरतूद मुलुंड पूर्व येथे क्रीडा संकुल, नव्या नाट्यगृहाची स्थापना, पेट्रोल पंपाची तरतूद, ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन आणि विरंगुळा केंद्राची सुविधा असे अनेक मुद्दे पूर्ण करण्याचा ध्यास बाळगून मी प्रचार करत आहे.आतापर्यंत के लेली कामे?- गेल्या पंधरा वर्षांमध्ये मुलुंडचा ज्या वेगाने विकास होणे अपेक्षित होते तसे घडलेले नाही. मात्र विधान परिषद सदस्यपदी निवड होताच अवघ्या सहा वर्षांत मी हा विकास करून दाखवला. नाहूर रेल्वे पुलाच्या रुंदीकरणासाठी १०० कोटींचा निधी संमत करून घेतला. मुलुंडकरांसाठी नवीन स्मशानभूमी, तानसा पाइपलाइनलगतच्या ५00 झोपडीवासीयांंचे मुलुंडमध्येच पुनर्वसन, मुलुंडमधील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीसाठी ट्रक टर्मिनसची सुविधा, टोलमुक्त मुलुंड, त्याचप्रमाणे लादीकरण, शौचालये, वन्यजमिनीवरील झोपडीवासीयांंचे मुलुंडमध्ये म्हाडा-एमएमआरडीएच्या माध्यमातून प्रकल्प राबवून त्यांंचे पुनर्वसन मुलुंडमध्येच करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. तुमचे प्लस पॉइंट कोणते?- गेल्या १५ वर्षांपासून मी लोकांंची कामे करतो आहे. लोकांचा विश्वास हीच माझी खरी ओळख आहे. मुलुंडमधील नागरिकांसाठी मी एक राजकीय नेता नसून त्यांंच्या कुटुंबातलाच एक सदस्य आहे.