शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

‘जलयुक्त शिवार’ची खुली चौकशी एसीबीने केली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 10:23 AM

कॅगनेही ओढले होते ताशेरे, समितीने केली होती शिफारस

ठळक मुद्देकॅगनेही ओढले होते ताशेरे, समितीने केली होती शिफारस

प्रदीप भाकरे  अमरावती : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवारची खुली चौकशी सुरू केली आहे. यात राज्यातील एकूण ९२४ कामांचा समावेश असून, अमरावती परिक्षेत्रातील एकूण १९८ कामांचा समावेश आहे.  अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत १७ सप्टेंबर रोजी आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार उघड चौकशीला सुरुवात झाली आहे. एसीबीने त्यास दुजोरा दिला. 

अर्थतज्ज्ञ एच. एम. देसरडा यांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर जलयुक्तची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच महालेखापरीक्षक यांनीही अनियमितता असल्याचे ताशेरे ओढले होते. त्यामुळे या योजनेंतर्गत असलेल्या प्रकल्पांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नऊ सदस्यांची समिती तयार केली होती. या समितीने गोपनीय अहवाल दिल्यानंतर आता ९२४ कामांची चौकशी एसीबीने सुरू केली आहे.

काय होता आरोप ?

  • पाण्याची क्षमता कागदोपत्री कमी करून कामे मंजूर करून घेतली गेली. खोटे अहवाल तयार करण्यात आले. प्रत्यक्षात झालेल्या कामापेक्षा कंत्राटदारांना जास्त पैसे दिले. 
  • लोकसहभागातून करावयाची कामे  कंत्राटदाराकडून करून घेण्यासाठी प्रयत्न करणे, ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात मोठा गोंधळ आढळून आला. ठरावीक कंत्राटदारांना समोर ठेवून काम केल्याचा ठपका.
  • गरज नसताना जलसंधारणाऐवजी जेसीबी, पोकलेनसारख्या यंत्रांमार्फत बेसुमार खोदाई झाली. प्रत्यक्ष पाहणी अहवालात अनेक कामे पूर्ण नसल्याचा ठपका समितीने ठेवला. 

अशी होईल खुली चौकशीज्या प्रकरणांची उघड चौकशी करण्याचे आदेश शासनाने एसीबीला दिले आहेत, त्याबाबतची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी कार्यालय व जलसंधारण विभागाला मागितली जाईल. अनियमितता आढळल्यास गुन्हा दाखल होईल. १० लाखांपेक्षा अधिक किमतीच्या कामांची चौकशी प्राधान्याने होईल.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रJalyukt Shivarजलयुक्त शिवारBJPभाजपाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग