शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांचे शैक्षणिक आॅडिट होणार

By admin | Updated: February 24, 2015 04:28 IST

अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये पूर्ण वेळ प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या त्वरित कराव्यात;

मुंबई : अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये पूर्ण वेळ प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या त्वरित कराव्यात; तसेच महाविद्यालयामधील पायाभूत सुविधा, शैक्षणिक बाबी आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने सुधारणा करण्यासाठी सर्व महाविद्यालयांचे शैक्षणिक आॅडिट करण्याचे आदेश शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत. राज्यातील अकृषिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीला राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू तसेच बोर्ड आॅफ कॉलेज अ‍ॅण्ड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंटचे संचालक, विभागाचे सचिव आदी अधिकारी उपस्थित होते. राज्यातील विद्यापीठांचा दर्जा जागतिक विद्यापीठाच्या यादीमध्ये उंचविण्यासाठी संशोधनावर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शैक्षणिक नियोजन आणि त्रैमासिक आढावा योग्य पद्धतीने व कालबद्ध स्वरूपात घेण्यासाठी विद्यापीठातील कुलगुरूंची त्रैमासिक बैठक आयोजित करण्यात येणार आहे.विद्यापीठ व महाविद्यालयांच्या कामासाठी कुलगुरू व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना वारंवार मंत्रालय आणि सहसंचालकांच्या कार्यालयात यावे लागते. ही कामे तातडीने मार्गी लागावीत यासाठी विद्यापीठ व महाविद्यालय यांनी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. या अधिकाऱ्यांनी संबंधित विभागातील सर्व कामकाजाचा पाठपुरावा करावा आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक आणि उपसचिव यांनी विद्यापीठाच्या विविध समस्या, अडचणी आणि प्रश्न यामधून मार्ग काढावा, अशा सूचनाही तावडे यांनी दिल्या. (प्रतिनिधी)