शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
2
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
3
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
4
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
5
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
6
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
7
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
8
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
9
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
10
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
11
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
12
विशेष लेख: मोदी म्हणतात, ‘काँग्रेस फुटेल!’-खरेच तसे होईल?
13
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
14
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
15
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
16
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
17
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
18
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
19
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
20
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 10:18 IST

SpiceJet plane : ही फ्लाईट पुढे जयपूरला जाणार होती. प्रवासी अतिश मिश्रा यांनी याचा फोटो, व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला होता. यानंतर हे विमान पुणे विमानतळावर उतरले तेव्हा ती खिडकी दुरुस्त करण्यात आल्याचे स्पाईस जेटने म्हटले आहे.

एअर इंडियाच्या विमान अपघाताची भीती अद्याप लोकांच्या मनातून गेलेली नसताना स्पाईस जेटच्या विमानाच्या प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. गोव्याहून पुण्याला येत असलेल्या विमानाच्या खिडकीची फ्रेमच निखळून बाहेर आली होती. यामुळे प्रवाशांच्या काळजात चर्रर्र झाले होते. परंतू, विमान सुखरुप पुणे विमानतळावर उतरले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 

विमानाची जी खिडकी असले तिला बाहेरून काच असते. या काचेवर एक होल असतो. जेणेकरून ती काच तडकत नाही. तसेच आतून या खिडकीला फ्रेम असते, त्यात एक पडदा असतो. जो प्रवाशाला प्रकाश नको असेल तर उघडझाप करता येतो. ती जी आतल्याबाजुची फ्रेम असते तीच निखळून बाहेर आली होती. यामुळे विमानाच्या स्ट्रक्चरला कोणता धोका नव्हता. परंतू, या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

"स्पाईसजेटच्या Q400 विमानातील एक कॉस्मेटिक विंडो फ्रेम सैल झाली आणि ती निखळलेली आढळली. हा एक नॉन-स्ट्रक्चरल ट्रिम घटक होता, जो प्रकाश रोखण्यासाठी खिडकीवर बसवण्यात येतो. त्यामुळे विमानाची सुरक्षितता किंवा अखंडता कोणत्याही प्रकारे धोक्यात आली नाही," असे एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे.

ही फ्लाईट पुढे जयपूरला जाणार होती. प्रवासी अतिश मिश्रा यांनी याचा फोटो, व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला होता. यानंतर हे विमान पुणे विमानतळावर उतरले तेव्हा ती खिडकी दुरुस्त करण्यात आल्याचे स्पाईस जेटने म्हटले आहे. या प्रवाशाने डीजीसीएला देखील टॅग केले होते. 

उड्डाण करताच ९०० फूट खाली आलेले एअर इंडियाचे विमान...अहमदाबादमध्ये विमान अपघात घडल्यानंतर अवघ्या ३८ तासांमध्येच दिल्लीमध्ये एअर इंडियाचं आणखी एक विमान अशाच अपघातातून थोडक्यात बचावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  दिल्ली येथून व्हिएन्ना येथे जाणाऱ्या एअर इंडियाच्या १८७ या विमानाने उड्डाण करताच इशारे देण्यास सुरुवात केली होती. बोईंग ७७७ प्रकारच्या या विमानाने दिल्ली येथून उड्डाण करताच स्टॉल वॉर्निंग, ग्राऊंड प्रॉक्सिमिटी वॉर्निंग सिस्टिम ची डोंट सिंक वॉर्निंग कॉकपिटमध्ये मिळू लागली. याचाच अर्थ हे विमान उंचीवरून वेगाने खाली येऊ लागले होते. उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हे विमान सुमारे ९०० फुटांपर्यंत खाली आले होते.  

 

टॅग्स :spicejetस्पाइस जेटgoaगोवाPuneपुणे