शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वेदनेचेही गाणे करणारे व्यक्तिमत्त्व, प्रा. प्रवीण दवणे यांची आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 08:45 IST

Asha Bhosle: ज्यांच्या खळखळत्या  लोभस हास्याला निर्मळ आनंदाचे परिमाण दिले, त्या जीवनचिंतक आशाताई मला कधी  गीतांच्या ध्वनिमुद्रणाच्या, कधी प्रत्यक्ष भेटीच्या, कधी त्यांची जाहीर मुलाखत घेण्याच्या निमित्ताने  भेटत गेल्या, अशा शब्दांत ज्येष्ठ कवी प्रा. प्रवीण दवणे यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना आदरांजली वाहिली.

ठाणे -  आशा  भोसले नावाचा स्वरांचा अथांग गाण्याचा समुद्र! देहसीमेपलीकडे गेलेल्या असीम आशा भोसले  यांच्याबद्दल  मी  काय नि किती बोलणार! आणि  आजच्या या चिरविरह कातरक्षणी बोलणेही अवघड.  जीवनानेच ज्यांचे जगणे सघन केले,  ज्यांच्या खळखळत्या  लोभस हास्याला निर्मळ आनंदाचे परिमाण दिले, त्या जीवनचिंतक आशाताई मला कधी  गीतांच्या ध्वनिमुद्रणाच्या, कधी प्रत्यक्ष भेटीच्या, कधी त्यांची जाहीर मुलाखत घेण्याच्या निमित्ताने  भेटत गेल्या, अशा शब्दांत ज्येष्ठ कवी प्रा. प्रवीण दवणे यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना आदरांजली वाहिली.

पुढे ते म्हणाले, सुरांइतकीच त्यांना साथ दिली ती अनपेक्षित दुःखांनी! अपेक्षाभंगांनी! तरीही  त्या इतक्या चैतन्यांनी रसरसलेल्या कशा? मला कुतूहल होते. मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी त्यांच्या घरी गेलो होतो. ‘प्रभुकुंज’मधील बैठक खोलीत पाहिले, दुथडी भरून  वाहणारा नदीचा हिमशुभ्र फेसाळणारा वॉलपेपर पाहून ताजातवाना झालो. आशाताईंना विचारले, ‘अगदी खरीखुरी नदी वाटते; इतकी आवडते नदी?’ त्या चटकन म्हणाल्या, ‘हो, मला कंटाळा आला की मी या नदीकिनारी बसते. पुन्हा नव्या उत्साहाने कामाला लागते. कारण, नदी नेहमी कचरा किनाऱ्यावर फेकून, स्वच्छ वर्तमानात जगते! मी या नदीकडूनच  आयुष्य शिकले.’

समर्पण, काव्य नि परिपूर्णतागायनातील समर्पण, काव्य, सूर नि परिपूर्णता यांबद्दल आग्रही आशाताई अनुभवल्या. संगीतकार प्रभाकर जोग यांनी आशाताईंच्या स्वरात मी लिहिलेले, ‘मैफलीला हा घ्या मुजरा’ हे मुजरागीत, तर संगीतकार श्रीकृष्ण चंद्रात्रे यांनी लिहून घेतलेले, ‘साद घालते तुला!’ हे प्रीतिपर भावगीत व संगीतकार अनिल मोहिले यांनी महेश कोठारे यांच्या ‘जिवलगा’ साठी सर्वच गाणी आशाताईंच्या स्वरात ध्वनिमुद्रित केली. ‘जिवलगा’साठी नवीन नायिका असेल, हे समजताच त्या नव्या मुलीला बोलावून गप्पा केल्या. ‘जिवलगाsss’ अशी साद घालताना तिचे ओठ कसे व किती उघडतील याचा विचार केला. यशाच्या सर्वोच्च शिखरावर असूनही इतके अचूक असणे, हेच त्यांच्या थोरवीचे गमक मला उलगडत होते, अशी आठवण दवणे यांनी सांगितली.

English
हिंदी सारांश
Web Title : Prof. Pravin Davane's tribute: A personality who sang of pain too.

Web Summary : Prof. Pravin Davane paid tribute to Asha Bhosle, recalling recording sessions, meetings, and interviews. He highlighted her resilience despite sorrow, her love for life learned from a river, and her dedication to perfection in singing. He remembered her involvement in the song 'Jivalaga'.
टॅग्स :Asha Bhosaleआशा भोसले