शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बेस्टचे 97 टक्के कर्मचारी संपाच्या विचारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 18:44 IST

अनेक प्रलंबित मागण्यांमुळे वैतागलेले बेस्टचे कर्मचारी संपावर जाण्याच्या विचारात आहेत. आज बेस्टमधील सर्व कामगार संघटनांच्या संयुक्त कृती

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 -  अनेक प्रलंबित मागण्यांमुळे  वैतागलेले बेस्टचे कर्मचारी संपावर जाण्याच्या विचारात आहेत. आज बेस्टमधील सर्व कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने आयोजित केलेल्या मतदानात तब्बल 97 टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिला आहे. मात्र संपाबाबतचा अंतिम निर्णय शुक्रवारी घेण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम असलेल्या बेस्टची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षात खालावली आहे.
संपाचे हत्यार उपसण्याआधी बेस्टच्या कर्मचारी संघटनांच्या संयुक्त समितीने कामगारांचा कल जाणून घेतला. त्यासाठी मतदानाचा अवलंब करण्यात आला. या मतगानामध्ये बेस्टच्या विविध विभागातील 19 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात काही अपवाद वगळता बहुतांश मतदारांनी संपाच्या बाजूने मत दिले आहे.  
अधिक वाचा
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे )( बेस्ट बचाव आराखडा समितीने फेटाळला )( बेस्ट कृती आराखडा लांबणीवर )
 दरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांनी पगार वेळेत होत नसल्याने संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र  नंतर हा संप मागे घेण्याता आला होता. बेस्ट प्रशासनाने मे महिन्याचा अर्धा पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला होता.  
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अडचणीत असलेल्या बेस्टची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.  त्यामुळे बेस्ट प्रशानाला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.