शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेला ९३ कोटींची मदत

By admin | Updated: June 5, 2014 01:00 IST

मुंबईत बुधवारी रात्री झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत शासनाने नागपूर जिल्हा बँकेला ९३ कोटींच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. ही मदत भागभांडवल स्वरुपात राहील. त्यामुळे बँकेचे नेटवर्थ सकारात्मक होईल,

भागभांडवल : रिझर्व्ह बँकेचा परवाना मिळणारमोरेश्‍वर मानापुरे - नागपूर मुंबईत बुधवारी रात्री झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत शासनाने नागपूर जिल्हा बँकेला ९३ कोटींच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. ही मदत  भागभांडवल स्वरुपात राहील. त्यामुळे बँकेचे नेटवर्थ सकारात्मक होईल, शिवाय  सीआरएआर ४ टक्क्यांवर गेल्याने बँकेला रिझर्व्ह बँकेचा आर्थिक  परवाना मिळण्यास काहीच अडचणी येणार नाही.शासनाने घोषित केलेल्या ३१९ कोटींपैकी वर्धा बँकेला १0२ कोटी आणि बुलडाणा बँकेला १२४ कोटींची मदत भागभांडवल स्वरुपात राहील.  याआधी शासनाने अशा प्रकारची मदत धुळे नंदूरबार बँकेला केली होती. याआधी नागपूर जिल्हा बँकेचे नेटवर्थ ७७.४१ कोटींनी निगेटिव्ह होते.  शासनाच्या ९३ कोटींच्या मदतीने हे नेटवर्थ १५.५९ कोटींनी पॉझिटिव्ह होईल. याशिवाय ९.९८ टक्के असलेला सीआरएआर नेटवर्थ पॉझिटिव्ह  झाल्याने ३१.१८ कोटींवर जाईल. तो ४ टक्क्यांपेक्षा (३१.१८ कोटी) जास्त असेल. यामुळे रिझर्व्ह बँकेच्या सर्व अटींची पूर्तता होईल. शिवाय बँकेचे  व्यवहार लवकरच नियमित होतील.