शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन क्षेत्रात ८.१२ लाख हेक्टरची वाढ!

By admin | Updated: March 18, 2015 02:13 IST

लाभक्षेत्रातील सिंचित क्षेत्रात एका वर्षात ८.१२ लाख हेक्टरनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. शिवाय जलसाठ्याची क्षमता वाढल्याची आकडेवारीही आर्थिक पाहणी अहवालातून उघड झाली आहे.

अतुल कुलकर्णी -मुंबईजलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील लाभक्षेत्रातील सिंचित क्षेत्रात एका वर्षात ८.१२ लाख हेक्टरनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. शिवाय जलसाठ्याची क्षमता वाढल्याची आकडेवारीही आर्थिक पाहणी अहवालातून उघड झाली आहे. २०११-१२मध्ये अशाच अहवालात सिंचन क्षेत्रात ०.१ टक्का वाढ झाल्यावरून गहजब झाला होता. हा अहवाल म्हणजे भाजपा सरकारने राष्ट्रवादी सरकारच्या जलसंपदा विभागाला दिलेले प्रशस्तिपत्र आहे, अशी प्रतिक्रिया माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी दिली आहे. आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला, त्यामुळे सिंचन क्षेत्रात केवळ ०.१ टक्का वाढ झाली, असा आरोप भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांनी २०११-१२च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केला होता. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘श्वेतपत्रिका’ काढण्याची घोषणा केली. जलसंपदातील कथित गैरव्यवहाराचे प्रकरण थेट न्यायालयात गेले. सरकारने माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती नेमली. चितळे समितीने दिलेल्या अहवालात इतर तांत्रिक बाबींवर बोट ठेवतानाच सिंचन क्षेत्र वाढल्याचे म्हटले होते.सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारने विदर्भ आणि कोकणातील सिंचन प्रकल्पांची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. या आदेशाची शाई वाळत नाही, तोच आलेल्या २०१४-१५च्या आर्थिक पाहाणी अहवालात राज्यातील सिंचन क्षेत्रात ८.१२ लाख हेक्टरनी वाढ झाल्याचे म्हटले आहे. या वाढीव सिंचनाचे श्रेय कोणाला, यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात.असे असले तरी खरी गोम वेगळीच आहे. जलसंपदातील एक ज्येष्ठ अधिकारी म्हणाले, टक्केवारीमध्ये सिंचन क्षमता मोजण्याची कोणतीही निश्चित अशी पद्धती आजही उपलब्ध नाही. त्यामुळे टक्केवारीत सिंचन क्षमता न मोजता हेक्टरमध्ये मोजली जाते. कारण, लाभ क्षेत्राच्या आतले आणि बाहेरचे क्षेत्र कसे व किती मोजायचे, त्यातून सिंचनाची टक्केवारी किती व कशी ठरवायची, याचे काहीही सूत्र नाही. त्यामुळे त्यावर एक समिती नेमण्यात आली आहे. समितीचा अहवाल अजून आलेला नाही.चव्हाणांनी अहवाल वाचावाविधिमंडळात मांडला गेलेला अहवाल आता तरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काळजीपूर्वक वाचावा. शंका असतील तर नव्या जलसंपदा मंत्र्यांना विचाराव्यात, अशी टीका माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी केली. ते म्हणाले, आम्ही हेच सांगत होतो; पण चव्हाण यांनी राजकीय स्वार्थासाठी स्वत:च्या पक्षाला आणि सहयोगी राष्ट्रवादीलाही अडचणीत आणले.