शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

८० प्रवासी विमानातच खोळंबले

By admin | Updated: October 9, 2015 05:20 IST

विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची घटना ताजी असतानाच टर्बो मेघा एअरवेज कंपनीने प्रवाशांची असुविधा सुरूच ठेवली आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून

औरंगाबाद : विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याची घटना ताजी असतानाच टर्बो मेघा एअरवेज कंपनीने प्रवाशांची असुविधा सुरूच ठेवली आहे. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी या कंपनीच्या विमानाने तिरुपतीला गेलेल्या ८० प्रवाशांना खराब हवामानाचे कारण देत हैदराबादमध्ये वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त करीत आंदोलन केले. रात्री उशिरापर्यंत प्रवासी हैदराबाद विमानतळावर विमानातच बसून होते. चिकलठाणा विमानतळावरून गुरुवारी दुपारी ३.३० वाजता टर्बो मेघा एअरवेज कंपनीच्या विमानाने तिरुपतीसाठी ८० प्रवासी रवाना झाले. हे विमान हैदराबादला पोहोचल्यानंतर सायंकाळी ६ वाजता विमानाने तिरुपतीसाठी उड्डाण घेतले; परंतु काही वेळेनंतर हे विमान पुन्हा हैदराबाद विमानतळावर परत आले. खराब हवामान आणि पावसामुळे विमान परत आणल्याची माहिती यावेळी प्रवाशांना देण्यात आली. विमान हैदराबाद विमानतळावरच उभे करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत विमान तिरुपतीकडे रवाना होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त करीत आंदोलनाची भूमिका घेतली. रात्री उशिरापर्यंत प्रवासी विमानातच बसलेले होते. ८० प्रवाशांमध्ये जवळपास २२ प्रवासी हे शहरातील आहेत. कंपनीने कोणतीही सुविधा दिली नाही, असे प्रवाशांनी सांगितले.(प्रतिनिधी)कंपनी म्हणते खराब हवामानामुळे...खराब हवामानामुळे विमान तिरुपतीहून हैदराबादला परतआले. प्रवाशांची हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था क रण्याची आमची तयारी आहे; परंतु प्रवाशांनी त्यास प्रतिसाद दिला नाही, असे टर्बो मेघा एअरवेज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. उमेश यांनी सांगितले.