शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात स्वाइन फ्लूचे ६७८ रुग्ण - आरोग्यमंत्री

By admin | Updated: February 20, 2015 01:06 IST

राज्यात आतापर्यंत ६७८ रुग्णांची स्वाइन फ्लू चाचणी पॉझिटिव्ह आली असून, ८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाइन नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.

नागपूर : राज्यात आतापर्यंत ६७८ रुग्णांची स्वाइन फ्लू चाचणी पॉझिटिव्ह आली असून, ८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाइन नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. ५०पेक्षा जास्त खाटा असणाऱ्या खासगी इस्पितळांमध्ये या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्याचे व रुग्णाचे आर्थिक शोषण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी दिली.स्वाइन फ्लूवर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. डॉ. सावंत म्हणाले, मुंबईच्या धर्तीवर पुणे आणि नागपूरमधील स्वाइन फ्लू नमुन्याचे खासगी तपासणीचे शुल्क अर्ध्यावर आणण्याचा प्रयत्न आहे. राज्यात ५०पेक्षा जास्त खाटा असणाऱ्या इस्पितळांनी स्वाइनच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करावा, असे निर्देश त्यांनी दिले.आरोग्यमंत्र्यांची पाठराज्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूने ८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील ४० टक्के मृत्यू एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. सर्वांत जास्त रुग्ण मेडिकलच्या स्वाइन फ्लू वॉर्डात आहेत. विशेष म्हणजे, गुरुवारी डॉ. दीपक सावंत मेडिकलमध्ये आले व तेथे बैठक घेतली. परंतु स्वाइन फ्लू वॉर्डाला भेट न देताच निघून गेले. यामुळे आरोग्य विभागाच्या वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ४० रुग्णांची स्थिती गंभीरजानेवारी ते आतापर्यंत राज्यात ९७ हजार २४८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात स्वाइन फ्लूच्या ६ हजार ८८६ संशयित रुग्णांना टॅमी फ्लूचे औषध देण्यात आले. महाराष्ट्रात उपचार घेत असताना इतर राज्यातील नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. यात मध्य प्रदेशातील ६, गुजरातमधील १, आंध्र प्रदेशातील १ आणि उत्तर प्रदेशातील एका रुग्णाची नोंद आहे. राज्यात सध्याच्या घडीला २०५ रुग्ण भरती आहेत. यातील ४० रुग्णांची स्थिती गंभीर असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ११७ रुग्णांवर यशस्वी उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.