शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या फेरीत ६,५०० प्रवेश

By admin | Updated: July 23, 2014 00:53 IST

बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढल्यामुळे यंदा प्रवेश चांगल्या प्रमाणात होतील, ही महाविद्यालयांची अपेक्षा ‘कॅप’च्या (सेंट्रलाईज अ‍ॅडमिशन प्रोसेस) पहिल्या फेरीत तरी फोल ठरली आहे.

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया : महाविद्यालयांची चिंता वाढलीनागपूर : बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढल्यामुळे यंदा प्रवेश चांगल्या प्रमाणात होतील, ही महाविद्यालयांची अपेक्षा ‘कॅप’च्या (सेंट्रलाईज अ‍ॅडमिशन प्रोसेस) पहिल्या फेरीत तरी फोल ठरली आहे. पहिल्या फेरीत नागपूर विभागातील केवळ साडेसहा हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे तसेच बाहेरील महाविद्यालयांना प्राधान्य दिल्यामुळे, महाविद्यालयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.‘डीटीई’तर्फे (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) राबविण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेमध्ये सध्या ‘कॅप’ची दुसरी फेरी सुरू आहे. परंतु पहिल्या फेरीत महाविद्यालये ‘अलॉट’ होऊनदेखील अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाही. निवडक आठ महाविद्यालये सोडली तर इतर ठिकाणी प्रवेशाचा दुष्काळच आहे. विभागातील काही महाविद्यालयांमध्ये तर एकही प्रवेश झाला नसल्याची माहिती ‘डीटीई’च्या सूत्रांनी दिली आहे. विभागातील ५७ महाविद्यालयांमध्ये २५,०५२ जागा आहेत. ‘आॅनलाईन’ प्रक्रियेत केवळ १७,१९६ म्हणजेच सुमारे ७० टक्के अर्ज दाखल झाले होते. पहिल्या फेरीत यापैकी जवळपास ६,५०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत; म्हणजे अजूनही ७४ टक्के जागा रिक्त आहेत. अनेक विद्यार्थ्यांना आवडीचे महाविद्यालय न मिळाल्याने त्यांनी ‘अलॉट’ झालेल्या जागेवर प्रवेश घेतलेच नाही. दुसऱ्या फेरीकडून त्यांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत, अशी माहिती ‘डीटीई’च्या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)विद्यापीठाची डागाळलेली प्रतिमा कारणीभूतनिवडक नावे सोडली तर नागपूर विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचा दर्जा ढासळतो आहे. त्यातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची छबीदेखील फारशी चांगली नाही. मागील दोन वर्षांपासून विद्यापीठात सुरू असलेले निरनिराळे वाद आणि गोंधळांमुळे प्रतिमा आणखी डागाळली आहे. शिवाय अभियांत्रिकीच्या मूल्यांकनाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येतात. त्यातून गेल्या दोन वर्षांत अनेकदा आंदोलनेदेखील झाली. ही बाब लक्षात घेता अनेक विद्यार्थ्यांनी बाहेरील विद्यापीठात प्रवेश घेण्यासच प्राधान्य दिले व पर्यायाने विभागातील महाविद्यालयांना याचा फटका बसताना दिसतो आहे.