शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांमध्ये 61 मातांचा मृत्यू

By admin | Updated: July 10, 2014 00:34 IST

प्रत्येक गर्भवतीची प्रसूती सुरक्षित व्हावी, म्हणून सरकार आणि इतर यंत्रणा कार्यरत आहे. जननी सुरक्षा योजना राबविली जात आहे.

पूजा दामले  - मुंबई
प्रत्येक गर्भवतीची प्रसूती सुरक्षित व्हावी, म्हणून सरकार आणि इतर यंत्रणा कार्यरत आहे. जननी सुरक्षा योजना राबविली जात आहे. मात्र तरीही मुंबईसारख्या शहरामध्ये माता मृत्यूचा आकडा वाढता आहे. एप्रिल आणि मे 2क्14 या दोन महिन्यांच्या दरम्यान एकूण 61 मातांचा मृत्यू झाल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.  
एप्रिल आणि मे 2क्13 या दोन महिन्यांमध्ये एकूण 31 मातांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. एका वर्षानंतर एप्रिल आणि मे 2क्14 या दोन महिन्यांमध्ये 61 मातांचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे. यामध्ये 26 माता या मुंबईतील तर उर्वरित 35 माता या मुंबईबाहेरील असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षामध्ये माता मृत्युदराचा आकडा हा मुंबई शहरामध्ये चढाच पाहायला मिळालेला आहे. 2क्क्9-1क् या वर्षात मुंबईमध्ये एकूण 2क्6 मातांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. यामध्ये 125 माता या मुंबईतील होत्या, तर 81 माता या मुंबईबाहेरून मुंबईमध्ये प्रसूतीसाठी आलेल्या होत्या. 2क्13-14 या एका वर्षात माता मृत्यूचा आकडा 276 वर पोहोचलेला आहे. यामध्ये 126 माता या मुंबईतील तर 15क् माता या मुंबईबाहेरील होत्या. 2क्12-13 या वर्षामध्ये तब्बल 278 मातांचा मृत्यू झाला होता. गेल्या पाच वर्षामध्ये या वर्षी सर्वाधिक मातांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आलेली आहे.  
मुंबईत पालिकेची तीन मुख्य रुग्णालये आहेत. यामुळे मुंबईजवळील कोणत्याही रुग्णालयात प्रसूतीच्या वेळी गुंतागुंत झाल्यास त्या महिलेला मुंबईच्या रुग्णालयात पाठवले जाते. यामुळे मुंबईतील माता मृत्यूच्या संख्येत मुंबईबाहेरील मातांच्या आकडेवारीचाही समावेश आहे, असे आरोग्य विभागाच्या एका अधिका:याने सांगितले.   गर्भारपणामध्ये काय काळजी घ्यावी, याविषयी आता जनजागृती झाल्याचे दिसून येत आहे. काही वर्षापूर्वीर्पयत गर्भवती महिलांच्या नोंदणीचे प्रमाण कमी होते. आता हे प्रमाण वाढले आहे. माता मृत्यू टाळण्यासाठी काही गोष्टी होणो गरजेचे आहे. 
यामध्ये पहिल्यांदा महिलेच्या नावाची नोंदणी करणो अत्यावश्यक आहे. एका गर्भारपणामध्ये किमान चार वेळा त्या महिलेच्या तपासण्या झाल्या पाहिजेत. 12 आठवडय़ांत पहिली तपासणी झाली पाहिजे. या वेळी तिच्या रक्ताची, लघवीची तपासणी झाली पाहिजे. एकदा तरी सोनोग्राफी झाली पाहिजे. गर्भवती महिलेचा आहार सकस असला पाहिजे. दुपारी किमान 2 तास झोपले पाहिजे आणि रात्री सहा तासांची झोप मिळाली पाहिजे, असा सल्ला कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजश्री कटके यांनी दिला.     
 
मृत्यूची कारणो
च्प्रसूतीदरम्यान अति रक्तस्त्रव होणो 
च्जंतूसंसर्गाची लागण होणो
च्अॅनिमिया (रक्तक्षय) होणो 
च्प्रसूतीदरम्यान सकस आहार न घेतल्याने माता कुपोषित राहणो 
 
बाहेरील रुग्ण
मुंबईत पालिकेची तीन मुख्य रुग्णालये आहेत. यामुळे मुंबईजवळील रुग्णालयात प्रसूतीच्या वेळी गुंतागुंत झाल्यास त्या महिलेला मुंबईच्या रुग्णालयात पाठवले जाते. यामुळे मुंबईतील माता मृत्यूच्या संख्येत मुंबईबाहेरील मातांच्या आकडेवारीचाही समावेश आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले.