शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादकांकडून ६० लाखांचा दंड वसूल

By admin | Updated: July 6, 2014 00:42 IST

अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत फॉर्म डी१ मध्ये ३१ मे २०१३ पर्यंत माहितीयुक्त वार्षिक परतावा न भरलेल्या नागपूर विभागातील परवानाधारक उत्पादकांकडून अन्न प्रशासन विभागाने ६० लाख रुपयांचा दंड

अन्न प्रशासन विभागाची मोहीम : नागपूर विभागात ९७२ परवानाधारकमोरेश्वर मानापुरे - नागपूर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत फॉर्म डी१ मध्ये ३१ मे २०१३ पर्यंत माहितीयुक्त वार्षिक परतावा न भरलेल्या नागपूर विभागातील परवानाधारक उत्पादकांकडून अन्न प्रशासन विभागाने ६० लाख रुपयांचा दंड वसूल केला असून फॉर्म डी२ मध्ये ५० हजारांचा दंड आकारल्याची माहिती आहे. नागपूर विभागातील नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ९७२ उत्पादक परवानाधारक आहेत. त्यापैकी नागपूर जिल्ह्यात ६०६ असून ३६७ उत्पादकांनी २०१२-१३ करिता वार्षिक विवरण भरले. शिवाय विवरण न भरलेल्या २७१ उत्पादकांकडून ३९ लाख २६ लाख रुपयांचा दंड वसूल केला. भंडारा जिल्ह्यात ७९ उत्पादकांपैकी २०१२-१३ करिता १७ जणांनी वार्षिक विवरण भरले तर ४ जणांकडून ६४ हजारांचा दंड वसूल केला. चंद्रपूर जिल्ह्यात १४१ पैकी ८९ उत्पादकांनी विवरण भरले तर ८९ उत्पादकांवर १३ लाख ८५ हजार रुपयांचा दंड आकारला. वर्धा जिल्ह्यात ७५ पैकी ४७ जणांनी विवरण भरले तर विवरण न भरलेल्या २५ जणांकडून ५३ हजारांचा दंड वसूल केला. गडचिरोली जिल्ह्यात ७१ उत्पादक आहेत. त्यापैकी ४८ जणांनी २०१२-१३ करिता वार्षिक विवरण भरले. विवरण न भरलेल्या ४७ उत्पादकांकडून ५ लाख ५१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विभागाच्या कडक कारवाईमुळे उत्पादकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळेच २०१३-१४ या आर्थिक वर्षाकरिता विवरण भरणारे परवानाधारक उत्पादक वाढले आहेत. ३१ मे २०१४ पर्यंतच्या नागपूर जिल्ह्यात २६१ उत्पादकांनी वार्षिक विवरण भरले. भंडारा जिल्ह्यातून ३, चंद्रपूर १०६, वर्धा ३२ आणि गडचिरोली जिल्ह्यातून ५१ उत्पादकांनी विवरण भरले आहे. डी२ मध्ये ५० हजाराचा दंडअन्न सुरक्षा व मानके कायद्यांर्गत दुग्ध उत्पादक परवानाधारकांना डी२ मध्ये वार्षिक विवरण भरावे लागते. नागपूर विभागात १७२ उत्पादक आहेत. ४४ उत्पादकांवर ५० हजारांचा दंड विभागाने आकारला. ९८ उत्पादकांनी वार्षिक विवरण भरले नाही. नागपूर जिल्ह्यात १३२ उत्पादक आहेत. त्यापैकी ४५ जणांनी विवरण भरले. भंडार जिल्ह्यात २५, चंद्रपूर ५, वर्धा ९ आणि गडचिरोली जिल्ह्यात दुग्धजन्स पदार्थाचे केवळ १ उत्पादक आहे. नवीन कायद्यांतर्गत उत्पादकांना फॉर्म डी१ आणि डी२ मध्ये वार्षिक विवरण भरणे आवश्यक आहे. या कायद्याची उत्पादकांना माहिती आहे. कायद्याची माहिती नसल्याचे कारण पुढे करून २०१२-१३ करिता विवरण न भरलेले अनेक उत्पादक आहेत. दंडाची आकारणी बेकायदेशीर असल्याचे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. सर्वांनी कायद्याचे पालन करावे, असे मत अन्न प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.