शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

५0 वर्षात वाशिम जिल्ह्याच्या लोकसंख्यावाढीचा ‘वारू’ बेफामपणे उधळला

By admin | Updated: July 11, 2014 00:05 IST

गत ५0 वर्षापूर्वी २२.0७ टक्के असणारा लोकसंख्या वाढीचा दर सन २0११ मध्ये १७.२३ टक्यांवर येऊन थांबला असला तरी जिल्ह्यात लोकसंख्या वाढीच्या वारूने बेफानपणे उधळणे थांबविले नाही.

वाशिम: गत ५0 वर्षापूर्वी २२.0७ टक्के असणारा लोकसंख्या वाढीचा दर सन २0११ मध्ये १७.२३ टक्यांवर येऊन थांबला असला तरी जिल्ह्यात लोकसंख्या वाढीच्या वारूने बेफानपणे उधळणे थांबविले नाही. तब्बल चौपट वाढलेल्या लोकसंख्येने ही बाब अधोरेखित केली आहे. १९५१ मध्ये जिल्ह्याची लोकसंख्या ३,१३,८८८ होती. तथापि, २0११ मध्ये मात्र यात चौपट वाढ होऊन ती तब्बल ११,९७,५00च्या घरात जाऊन पोहोचली आहे. गत काही वर्षांपासून शासनाने लोकसंख्येला आळा घालण्यासाठी केलेले प्रयत्न जिल्हावासीयांच्या फारसे पचनी पडले नाहीत. त्यामुळेच जिल्ह्याच्या लोकसंख्यावाढीची सरासरी राज्याच्या तुलनेत १.२४ टक्यांनी वाढलेलीच आहे. सन २0११ च्या जनगणनेत राज्याच्या लोकसंख्या वाढीची सरासरी १५.९९ आहे. तर जिल्ह्याच्या लोकसंख्या वाढीची सरासरी १७.२३ टक्के आहे. वाढलेल्या लोकसंख्येने समस्या निर्माण केल्या आहेत.** जिल्ह्याच्या शहरीकरणात झाली झपाट्याने वाढसन २00१ च्या जनगणनेच्या तुलनेत सन २0११ च्या जनगणनेत शहरीकरणात झपाट्याने वाढ झाली आहे. २00१ मध्ये जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, मंगरूळपीर व रिसोड अशा चार शहरातील लोकसंख्या १७८४४५ एवढी होती. सन २0११ मध्ये२११७0२ एवढी झाली आहे. त्या तुलनेत ग्रामिण भागाची लोकसंख्या मात्र कमी होत गेल ी असल्याचे दिसून येत आहे. साक्षरतेच्या प्रमाणात देखील शहरीभाग समोर निघुन गेला आहे.** जिल्ह्याच्या साक्षरतेमध्येसुद्धा झाली वाढसन २00१ च्या जनगणनेच्या तुलनेत सन २0११ च्या जनगणनेत साक्षरतेचे प्रमाण ८.३४ टक्यांनी वाढले आहे. २00१ मध्ये साक्षरतेचे प्रमाण ७३.३६ टक्के होते.तर २0११ मध्ये सदर प्रमाण ८१.७0 टक्यावर पोहोचले आहे. यामध्ये पुरूषांच्या साक्षरतेचे प्रमाण ९0.५४ तर महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण ७२.२६ टक्के आहे. या दहा वर्षाच्या कालखंडात महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण पुरूषांच्या तुलनेत दुपटीने वाढले आहे.