शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

५० लाखांचे सोने लुटले !

By admin | Updated: June 18, 2015 02:23 IST

प्राप्तिकर अधिकारी असल्याची बतावणी करीत सहा सशस्त्र दरोडेखोरांनी बुधवारी भरदुपारी येथील मातोश्री इमारतीत कारागिरांना चाकूचा धाक दाखवून त्यांना दोरीने बांधून त्यांच्याकडील ५० लाख रुपये किमतीचे

जळगाव : प्राप्तिकर अधिकारी असल्याची बतावणी करीत सहा सशस्त्र दरोडेखोरांनी बुधवारी भरदुपारी येथील मातोश्री इमारतीत कारागिरांना चाकूचा धाक दाखवून त्यांना दोरीने बांधून त्यांच्याकडील ५० लाख रुपये किमतीचे दीड किलो ५० ग्रॅम सोने लुटून नेले.रिधुरवाड्यात कैलास सोनवणे यांच्या मालकीच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर ६ व ८ क्रमांकाच्या खोलीत १४ बंगाली कारागीर राहतात. ते तेथेच दागिने घडविण्याचे काम करतात. बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास २५ ते ३५ वयोगटातील सहा जण एकाच वेळी इमारतीत आले. त्यातील तिघांकडे बॅग होती. नाशिकच्या प्राप्तिकर कार्यालयाकडून आल्याचे सांगून ते दोन्ही खोल्यामंध्ये शिरले.तिघांनी बॅगा उघडून त्यातील चाकू व सुरा काढून कारागिरांच्या मानेला लावला. दोरी व पडदा कापून त्याच कपड्याने सर्वांचे हातपाय बांधले व तोंडावर पट्टी बांधली. त्यानंतर तिजोरी फोडून त्यातील पाऊण किलो (७५० ग्रॅम) सोने काढले. खोली क्रमांक ६ मधील कारागिरांना खोली क्रमांक ८ मध्ये आणून त्यांचेही हातपाय बांधले. सर्व कारागिरांना कोंडून दुसऱ्या खोलीतील तिजोरीतील ८०० ग्रॅम सोने काढून त्यांनी पोबारा केला. दरोड्याची घटना घडल्याचे समजताच अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सहायक पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, शनी पेठचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांच्यासह कर्मचाऱ्यांची फौज घटनास्थळी दाखल झाली. श्वानपथक व फिंगर प्रिंट विभागानेही घटनास्थळी पाहणी केली. (प्रतिनिधी)