4,878 new patients found and 245 new deaths in maharashtra today says health department | CoronaVirus News: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1,74,761वर, एकाच दिवसात 245 जणांचा मृत्यू

CoronaVirus News: राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1,74,761वर, एकाच दिवसात 245 जणांचा मृत्यू

ठळक मुद्देगेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 4,878 नवे कोरोनाबाधित आढळून आले.245 जणांच्या मृत्यूची आज नोंद झाली, यातील 95 मृत्यू हे मागील 48 तासांतील आहेत. राज्यातील एकूण मृतांचा आकडा 7,855वर जाऊन पोहोचला आहे,

मुंबई - महाराष्ट्रातील कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढत होत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 4,878 नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर 245 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यातील 95 मृत्यू हे मागील 48 तासांतील आहेत. याच बरोबर, आता राज्यातील एकूण मृतांचा आकडा 7,855वर जाऊन पोहोचला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. आजच्या दिवसाची थोडी-फार दिलासादायक बाब म्हणजे, मागील चारही दिवस राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजारहून अधिक होता. तो आज खाली आला आहे.

राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता तब्बल 1,74,761वर पोहोचली आहे. आज नवीन 1,951 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. याच बोरोबर आतापर्यंत राज्यातील एकूण 90,911 रुग्ण ठणठणीत होऊन घरी गेले आहेत. राज्यात एकूण 75979 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईत राबवणार सेव्ह लाइव्ह स्ट्रॅटेजी - 
मुंबईत कोरोनाचे बळी जाण्यापासून रोखण्यासाठी सेव्ह लाइव्ह स्ट्रॅटेजी राबवण्यात येणार आहे. तसेच कोरोनामुळे झालेल्या प्रत्येक मृत्यूचे फॉरेन्सिक ऑडिट होणार असल्याची माहिती आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. मुंबईत आतापर्यंत 4461 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गंभीर आणि अति गंभीर रुग्णांवर योग्य प्रकारे उपचार केले जावेत. त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचाराबाबत रुग्णालय प्रशासन, संबंधित डॉक्टर कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus News: सर्दी-खोकल्याच्याही आधी दिसू शकतात कोरोनाची 'ही' अतिगंभीर लक्षणं, नव्या अभ्यासाचा दावा

CoronaVirus: भारतीय वैज्ञानिकांच्या लढ्याला मोठं यश! देशात कोरोनाची पहिली लस तयार; जुलैमध्ये होणार ट्रायल

कोरोनावरील ‘ही’ औषधं मिळणार मोफत? शासन स्तरावर विचार सुरू; खुद्द मुख्यंमत्र्यांनी सागितली नावं

CoronaVirus News: चीनने तयार केली आणखी एक कोरोना व्हॅक्सीन; सुरक्षित आन् परिणामकारक असल्याचा दावा

 

 

English summary :
CoronaVirus Marathi News and Live Updates: 4,878 new patients found and 245 new deaths in maharashtra today says health department

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 4,878 new patients found and 245 new deaths in maharashtra today says health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.