शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

३७ लाखांचे बनावट बियाणे जप्त

By admin | Updated: June 20, 2014 00:56 IST

बाजारातून खरेदी केलेले सोयाबीन साफ करून मध्य प्रदेशातील कंपनीच्या नावे कर्नाटकात विकण्यार्‍या टोळीला जिल्हा परिषद कृषी विभागाच्या पथकाने गुरुवारी पकडले.

आकोट : आकोटच्या स्थानिक बाजारातून खरेदी केलेले सोयाबीन साफ करून मध्य प्रदेशातील कंपनीच्या नावे कर्नाटकात विकण्यार्‍या टोळीला जिल्हा परिषद कृषी विभागाच्या पथकाने गुरुवारी पकडले. या व्यापार्‍यांकडून ३७ लाख रुपये किमतीचे सोयाबीन बियाणे जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, आकोट येथून ६४ टन सोयाबीन चार ट्रकद्वारे कर्नाटकच्या बाजारात पोहोचले आहे. कर्नाटक येथील व्यापारी बजरंग अग्रवाल याने आकोटच्या बाजारातून खरेदी केलेले सोयाबीन खरेदी करून आकोट-हिवरखेड मार्गावरील दुर्गा अँग्रो इंडस्ट्रिज येथे साफ करून इंडो अँग्री जेनेटिक्स सिड्स कंपनी देवास या मध्य प्रदेशातील ३0 किलोच्या थैल्यांमध्ये भरले जात होते. या थैल्यांवर देवासच्या कंपनीचा टॅगही लावण्यात येत होता. हे बियाणे येथून सरळ कर्नाटक राज्याच्या बाजारात विक्रीसाठी पाठविणे सुरू होते. या एका बॅगेची किंमत २७00 रुपये असल्याचे बॅगवर छापले आहे. आत्तापर्यंत अशा सोयाबीनचे चार ट्रक ६४ टन माल घेऊन कर्नाटकात पोचले आहेत. पाचवा ट्रक भरत असतानाच कृषी विभागाच्या भरारी पथकाने दुर्गा अँग्रो इंडस्ट्रिजवर छापा घातला असताना तेथे ४१४ क्विंटल सोयाबीन आढळून आले. याची किंमत ३७ लाख २९ हजार रुपये असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. जि. प. अकोलाचे कृषी विकास अधिकारी उदय काथोडे, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक शिरीष नानोटे व आकोट पं.स.चे कृषी अधिकारी अनिल राठोड यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी दुर्गा अँग्रो इंडस्ट्रिजचे संचालक संजय नंदकिशोर अग्रवाल तथा कर्नाटकचा व्यापारी बजरंग अग्रवाल या दोघांना भरारी पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी रीतसर पोलिस फिर्याद दाखल करून पुढील तपास होणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. या कारवाईदरम्यान अमरावती विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे, जिल्हा कृषी अधिकारी प्रमोद लहाने, उपविभागीय कृषी अधिकारी अशोक गायकवाड यांनी भेट दिली. वृत्त लिहिस्तोवर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती.