शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

राज्यात रब्बीच्या ३४ लाख हेक्टरवरील पेरण्या उरकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 19:57 IST

ज्वारी, हरभऱ्याच्या पेरणीला वेग : तूर, कापसावर रोग आणि अळीचा प्रादुर्भाव

ठळक मुद्देकार्यशाळा, गावबैठका आणि एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना सल्ले दणे अशा उपाययोजनाकापसावर गुलाबी बोंड अळी व रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव

पुणे : राज्यात रब्बीच्या ३४ लाख ५९ हजार हेक्टरवरील (६०.५९ टक्के) पेरण्या उरकल्या असून, रब्बी ज्वारी, हरभरा, गहू आणि मक्याच्या पेरणीने वेग घेतला आहे. कोकण आणि पुणे विभाग वगळता उर्वरीत ठिकाणी गुलाबी बोंड अळी, रस शोषणारी कीड, तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. रब्बी पिकाचे सरासरी क्षेत्र ५६ लाख ९३ हजार ६५ हेक्टर असून, पैकी ३४ लाख ४९ हजार २४१ हेक्टरवरील पेरणीची कामे झाली आहेत. ज्वारी पिक पोटरीच्या अवस्थेत असून, पिकांमधे आंतरमशागतीची कामे सुरु आहेत. रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र २६ लाख ७८ हजार ५१३ हेक्टर असून, १४ लाख ६६ हजार ९९७ हेक्टरवरील पेरणीची कामे (५५ टक्के) झाली आहेत. गव्हाचे सरासरी क्षेत्र १० लाख १४ हजार ८०४ हेक्टर पैकी ४ लाख ३० हजार ६६३, मक्याची २ लाख २५ हजार २६० हेक्टरपैकी १ लाख ७ हजार ४९८ हेक्टरवरील पेरणीची कामे झाली आहेत. हरभºयाचे सरासरी क्षेत्र १४ लाख ९० हजार २४७ हेक्टर असून, १३ लाख ४० हजार ३६१ हेक्टरवरील (९० टक्के) व कडधान्याचे सरासरी क्षेत्र १ लाख ९ हजार ९६८ हेक्टर असून, ७५ हजार २४३ हेक्टरवर (६८ टक्के) पेरणी झाली आहे. करडईची ८७ हजार ६०४ पैकी १६ हजार १६६, जवसाची २१ हजार ५०४ पैकी ५ हजार १२० (२४ टक्के) हेक्टरवरील पेरणीची कामे झाली आहेत. कोकण आणि पुणे वगळता राज्यात विविध ठिकाणी रोग आणि किडीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. कापसावर गुलाबी बोंड अळी व रस शोषणाऱ्याकिडींचा प्रादुर्भाव झाला आहे. तूर पिकावर हेलीकोव्हर्पा, पानफुलांना जाळे करणारी अळी, शेंगमाशी व शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित ठिकाणी कृषी विद्यापीठाकडून पीक संरक्षण सल्ले देण्यात येत आहे. फेरोमेन सापळे, ल्युअर्सचा पुरवठा, बाधीत क्षेत्रास तज्ज्ञांच्या भेटी, जनजागृती कार्यशाळा, गावबैठका आणि एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना सल्ले दणे अशा उपाययोजना करण्यात येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनFarmerशेतकरीagricultureशेती