शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीत महिना ३० कोटींची वाढ

By admin | Updated: September 6, 2016 01:01 IST

स्थानिक संस्था करातून (एलबीटी) दिलेली सवलत रद्द केल्याने महापालिकेच्या उत्पन्नात दर महिना २५ ते ३० कोटी रुपयांची वाढ होणार आहे.

पुणे : राज्य शासनाने विदेशी मद्य, वाईन, बिअर, देशी दारू आदी विक्रेत्यांना स्थानिक संस्था करातून (एलबीटी) दिलेली सवलत रद्द केल्याने महापालिकेच्या उत्पन्नात दर महिना २५ ते ३० कोटी रुपयांची वाढ होणार आहे. आॅगस्टपासून एप्रिलपर्यंत ८ महिन्यांचे २४० कोटी रुपयांचे वाढीव उत्पन्न महापालिकेला मिळू शकेल. मात्र, यानंतर राज्य शासनाकडून पालिकेला एलबीटीपोटी दिल्या जात असलेल्या अनुदानात कपात केली जाण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने एका आदेशान्वये १५ आॅगस्टपासून दारूविक्रीवरील एलबीटीची सवलत तडकाफडकी रद्द केली आहे. जीएसटी कायद्याची अंमलबजावणी सुरू होईपर्यंत एलबीटीची आकारणी सुरू राहणार आहे. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ५० कोटी पेक्षा कमी वार्षिक उलाढाल असलेल्या सर्व व्यापाऱ्यांना एलबीटीतून सूट दिली. त्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाकडून सर्व महापालिकांना अुनदान दिले जात आहे. >राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने विदेशी मद्य, वाईन, बिअर, देशी दारू खरेदी व विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सर्व विक्रेत्यांनी महापालिकेकडे एलबीटीअंतर्गत नोंदणी करावी, असा आदेश नगर सविच विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी जारी केला आहे. याची सर्व महापालिकांनी अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. एलबीटीची सवलत जाहीर करण्यात आल्यानंतर मद्याच्या किमती विक्रेत्यांकडून कमी करण्यात आल्या नव्हत्या; त्यामुळे एलबीटी पुन्हा लागू केल्यानंतरही या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे.