शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

२५ हजारांची ‘अवकाळी’ मदत

By admin | Updated: March 22, 2015 02:03 IST

राष्ट्रीय आपत्तीत गारपीट आणि अवकाळी पाऊस तसेच वीज कोसळून झालेल्या नुकसानीचा समावेश नसल्याने केंद्र सरकार अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीची भरपाई देऊ शकत नाही.

कृषिमंत्र्यांची माहिती : अवकाळी, गारपिटीचा राष्ट्रीय आपत्तीत लवकरच समावेशनाशिक : राष्ट्रीय आपत्तीत गारपीट आणि अवकाळी पाऊस तसेच वीज कोसळून झालेल्या नुकसानीचा समावेश नसल्याने केंद्र सरकार अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीची भरपाई देऊ शकत नाही. त्यामुळे लवकरच राष्ट्रीय आपत्तीमध्ये अतिवृष्टी व गारपीट या बाबींचा समावेश करण्यात येईल, असे सांगत तातडीची गरज म्हणून केंद्राकडून हेक्टरी १२, तर राज्य सरकारकडून १३ हजार अशी एकूण २५ हजारांची नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोेहन सिंग यांनी ओझर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची  पाहणी करण्यासाठी ते नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांनी सारोळे, वनसगाव यासह परिसरातील गावांना भेटी देऊन पाहणी केली. राष्ट्रीय आपत्तीच्या निकषात आवश्यक ते बदल करण्यासाठी केंद्र सरकारने एका समितीचे गठण केले असून, त्या समितीचा अहवाल पुढील महिन्यात प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. (प्रतिनिधी)कृषिमंत्र्यांचे कोणते वक्तव्य खरे?नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई केंद्र सरकार देऊ शकणार नाही. त्यासाठी राज्यांनी आपत्ती निवारण निधी वापरावा, असे टिष्ट्वट केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी शनिवारी सकाळी केले, तर हेक्टरी १३ हजार रुपये केंद्र सरकार देईल, अशी घोषणा त्यांनी ओझर येथे केली. त्यामुळे नेमके खरे काय, असा प्रश्न जाणकरांना पडला आहे.