शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

अडीच हजार सीसीटीव्ही ‘आंधळे’

By admin | Updated: January 12, 2015 03:39 IST

सुरक्षेच्या दृष्टीने घातपात व गैरकृत्याला प्रतिबंधासाठी अत्यावश्यक असणारे क्लोज सर्किट (सीसी)टीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढत असली

जमीर काझी, मुंबईसुरक्षेच्या दृष्टीने घातपात व गैरकृत्याला प्रतिबंधासाठी अत्यावश्यक असणारे क्लोज सर्किट (सीसी)टीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढत असली तरी त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. मुंबईसह राज्यभरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणांपैकी तब्बल २५३७ सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामध्ये पोलिसांसह विविध शासकीय विभाग व सार्वजनिक उपक्रमातील ११५९ कॅमेऱ्यांचा समावेश आहे. सीसीटीव्हीबाबतचे अपुरे ज्ञान व दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भविलेली असून, या निरोपयोगी ‘आंधळ्या’ कॅमेऱ्यांमुळे शासनाची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ या उक्तीप्रमाणे झालेली आहे. मुंबई व पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणचे ६४८ कॅमेरे केवळ दिखाव्यासाठी उभे असल्याचे गृह विभागातील अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.राज्य सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या आढाव्यामध्ये ही बाब चव्हाट्यावर आली आहे. महाराष्ट्रात सध्या ८६,६३३ सीसीटीव्ही कॅमेरे असून, त्यापैकी ८४ हजार ९६ कॅमेरे कार्यान्वित असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २६/११च्या घटनेनंतर घोषणा केलेला मुंबईत ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रकल्प अद्याप कागदावरच असला तरी उपरोक्त अस्तित्वात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे व त्यांच्या सद्य:स्थितीबाबतचा अहवाल गृहविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे. त्याची प्रत ‘लोकमत’ला मिळालेली असून, पोलिसांच्या विविध ४३ घटकांतर्गत खासगी, सार्वजनिक उपक्रम व सरकारी अशा तीन विभागांमध्ये वर्गवारी करून ३१ डिसेंबरपर्यंतची माहिती नमूद केलेली आहे. त्यानुसार एकूण ८६ हजार ६३३ कॅमेऱ्यांपैकी ८० टक्क्यांवर म्हणजे ६१,०१० इतके खासगी कॅमेरे बसविण्यात आलेले असून, त्यापैकी ५९,६३२ चालू तर १,३७८ बंद अवस्थेत आहेत. सार्वजनिक उपक्रमांतर्गत एकूण १४,९०२ कॅमेऱ्यांपैकी ५२९ बंद पडलेले आहेत, तर सरकारी विभागातील १० हजार ९१ कॅमेऱ्यांपैकी ६३० कॅमेरे दुरुस्तीअभावी बंद अवस्थेत असल्याचे नमूद केलेले आहे.