शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात होणार २२ नवीन आरोग्य संस्था

By admin | Updated: June 15, 2014 00:33 IST

आरोग्य विभागाने २००१ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य संस्था स्थापनेबाबतच्या मंजूर बृहत आराखड्यामध्ये विदर्भातील पाच जिल्ह्यात नवीन प्राथमिक उपकेंद्र १०, प्राथमिक आरोग्य केंद्र ९,

राज्य शासनाची हिरवी झेंडी : पाच जिल्ह्यांचा समावेशअमरावती : आरोग्य विभागाने २००१ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य संस्था स्थापनेबाबतच्या मंजूर बृहत आराखड्यामध्ये विदर्भातील पाच जिल्ह्यात नवीन प्राथमिक उपकेंद्र १०, प्राथमिक आरोग्य केंद्र ९, ग्रामीण रुग्णालय १ आणि ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन केलेले १ व ३०० खाटांच्या स्त्री रुग्णालयाचे ५०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन केले आहे. या बृहत आराखड्यात विदर्भासह राज्यात एकूण ५६ रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, १२५२ नवीन आरोग्य संस्था आणि ज्या आरोग्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात लोकसंख्या वाढलेली आहे, अशा ठिकाणच्या आरोग्य संस्थांमध्ये ८०१२ इतके वाढीव मनुष्यबळ मंजूर केले आहे. आरोग्य सेवा संचालकांच्या अध्यक्षतेखाली समितीने तयार केलेल्या अहवालानुसार आणि लोकप्रतिनिधींच्या आग्रही मागण्या लक्षात घेऊन विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात ७ आणि यवतमाळ जिल्ह्यात ३ नवीन आरोग्य उपकेंद्र मंजूर केले आहेत. याशिवाय अमरावती, गोंदिया व यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी १, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक ३, असे नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने स्थापन केले जाणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एक नवीन ग्रामीण रुग्णालय, गडचिरोलीत ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांमध्ये श्रेणीवर्धन करुन उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला जाणार आहे. नागपूर शहरातील ३०० खाटांच्या डागा स्मृती स्त्री रूग्णालयाचे ५०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन केले जाणार आहे. ही आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रबृहत आराखड्यानुसार नव्याने मंजूर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात कांडली, गडचिरोलीतील एटापल्ली-बुरगी कादोडी, चार्मोशी, लखमापूर, बोरी, भामरागड-कोठी, गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जूनी,चिखली, चंद्रपूर जिल्ह्यात बीबी, भंगाराम तळोधी, विरुर स्टेशन, यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात बोधेगाव अशा नऊ ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. घुग्गुस येथे ग्रामीण तर धानोऱ्यात उपजिल्हा रुग्णालयचंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथे नवीन ग्रामीण रुग्णालय आणि गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन केले जाणार आहे. नागपुरात ५०० खाटांचे स्त्री श्रेणीवर्धन रुग्णालयराज्य शासनाने २००१ च्या लोकसंख्येनुसार आरोग्य विभागाचा बृहत आराखड्यात राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातील ३०० खाटा असलेले डागा स्मृती स्त्री रुग्णालयाचे ५०० खाटांच्या स्त्री रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास मान्यता दिली आहे.