शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

अदानींचे ५०४ कोटी दिल्यानंतरच २२ सीमा तपासणी नाके होणार बंद, प्रस्ताव मंजुरीची फाईल मुख्यमंत्री कार्यालयात पडून

By सचिन यादव | Updated: July 10, 2025 17:25 IST

सेवाकर अन् उपकर वसुली अद्याप सुरुच 

सचिन यादवकोल्हापूर : राज्यात सुरू असलेल्या २२ सीमा तपासणी शुल्क नाके उभारणी केलेल्या अदानी कंपनीला सरकारकडून नुकसानभरपाई मिळालेली नाही. परिवहन विभागाने मंजुरीसाठी पाठविलेली ही फाईल मुख्यमंत्री कार्यालयात पडून आहे. त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने हे तपासणी नाके अद्याप सुरू आहेत.महाराष्ट्रात मोटार परिवहन आणि सीमाशुल्क विभाग यांच्या एकत्रित तपासणी नाक्यांसाठी इंटिग्रेटेड चेक पोस्ट प्रकल्प राबविला. त्यासाठी अदानी प्रा. लि. या कंपनीची नेमणूक केली होती. संबंधित सुविधांचे संचालन, देखरेखीसाठी त्यांच्यासोबत करार केले. राज्य सरकारने राज्यातील २२ तपासणी नाके बंद करण्याचा निर्णय घेतला.मात्र, संबंधित संस्थेला नुकसानभरपाई ५०४ कोटी देण्याचे ठरले. त्याबाबत प्रक्रिया सुुरू असून मंजुरी मिळालेली नाही. ही रक्कम दिल्यानंतरच संबंधित तंत्रज्ञान आणि स्थावर मालमत्ता परिवहन विभागाच्या मालकीची होणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव परिवहन विभागाने मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला आहे, मात्र अद्याप मंजुरीची प्रतीक्षा आहे.

दोन वर्षांपूर्वी राज्य परिवहन विभागाने नाके बीओटी तत्त्वावर आधुनिकीकरणाचा निर्णय घेतला होता. राज्य रस्ते विकास महामंडळाने नाके विकसित केले. अदानी समूहाच्या महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क या खासगी कंपनीशी २४ वर्षे ६ महिन्यांसाठी सवलत करार केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या १०० कलमी कार्यक्रमातंर्गत मुंबईतील एका कार्यक्रमात तपासणी नाके बंद करण्याची घोषणा केली होती.

पाच नाक्यांचे खासगीकरणराज्यातील चोरवड (जि. जळगाव), मरवडे (जि. सोलापूर), कागल (जि. कोल्हापूर), देगलूर (जि. नांदेड), इन्सुली (जि. सिंधुदुर्ग) या नाक्यांचे खासगीकरण केले. तेथे आता खासगी कंपनीतर्फे करवसुली सुरू आहे. कागल सीमा तपासणी नाका अदानी उद्योग समूहातील कंपनीमार्फत चालविला जात आहे. या कंपनीतर्फे वाहनचालक-मालकांकडून सेवा प्रक्रिया शुल्क, त्यावरील सेवाकर, उपकर वसुली केली जात आहे. चंदगड येथेही तपासणी नाका सुरू आहे.

देखभाल करत असलेल्या संस्थेला भरपाई दिली नसल्याचे समजते. त्यामुळे अद्याप सीमा तपासणी नाके सुरू आहेत. त्या ठिकाणी सेवाशुल्काच्या नावाखाली लूट सुरू आहे. - हेमंत डिसले, सेक्रेटरी कोल्हापूर लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन 

ही सर्व निर्णय प्रक्रिया राज्य सरकारच्या अखत्यारित आहे. त्यासंदर्भात कोणताही आदेश परिवहन कार्यालयाकडे आलेला नाही. - संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर.