शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

१८९ बलात्कार पीडिता मदतीपासून वंचित

By admin | Updated: July 30, 2016 01:44 IST

राज्यातील बलात्कार व अ‍ॅसिड हल्ला पिडीतांना १५ दिवसांत आर्थिक मदत देण्याची तरतूद सरकारच्या ‘मनोधैर्य’ योजनेत असतानाही मुंबई उपनगरांतील १८९ बलात्कार पिडीता घटना

मुंबई : राज्यातील बलात्कार व अ‍ॅसिड हल्ला पिडीतांना १५ दिवसांत आर्थिक मदत देण्याची तरतूद सरकारच्या ‘मनोधैर्य’ योजनेत असतानाही मुंबई उपनगरांतील १८९ बलात्कार पिडीता घटना घडून १५ दिवस उलटूनही सकारच्या आर्थिक मदतीपासून वंचित आहेत. ही आर्थिक मदत मंजूर करणाऱ्या सरकारच्या कारभाराचे इतिवृत्त सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. ‘फोरम अगेन्स्ट अप्रेशन आॅफ वुमेन’ या एनजीओने राज्य सरकार बलात्कार व अन्य अत्याचाराला बळी पडीलेल्या महिलांना ‘मनोधैर्य’ अंतर्गत नुकसान भरपाई देण्यास विलंब करत असल्याने सरकारला पिडीतांना ही नुकसान भरपाई वेळेत देण्याचे निर्देश द्यावे, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. गेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने मुंबई उपनगरांत किती बलात्काराच्या केसेस नोंदवण्यात आल्या आहेत आणि त्यापैकी किती पिडीतांना आर्थिक मदत देण्यात आली आहे, अशी विचारणा राज्य सरकारकडे केली होती.उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करत राज्य सरकारने मुंबई उपनगरांतील माहिती खंडपीठासमोर सादर केली. मुंबई उपनगरांत एकुण बलात्काराच्या व महिला अत्याचाराच्या एकूण १९२ केसेस नोंदवण्यात आल्या असून समितीने १८९ केसेसमधील महिलांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मात्र यापैकी बऱ्याच पिडीतांची बँक खाती नाहीत तर काहींचा पत्ता योग्य नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत मदत पोहचत नाही, असे सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले.सरकारच्या मनोधैर्य योजनेप्रमाणे १५ दिवसांत पिडीतेला आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. मात्र येथे तर सगळ्याच केसेसमधील पिडीतांना १५ दिवसांच्या आत मदत मिळालेली नाही. त्यामुळे सरकारची योजना निष्फळ ठरली आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने महिलांना आर्थिक मदत द्यायची की नाही, यावर निर्णय घेणाऱ्या समितीचे इतिवृत्त सादर करण्याचे निर्देश सरकारला दिले. (प्रतिनिधी)