शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

१६२ कायम विनाअनुदानित शाळा अनुदानासाठी पात्र

By admin | Updated: February 10, 2015 02:40 IST

कायम विनाअनुदानित तत्त्वावरील खासगी माध्यमिक शाळांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मूल्यांकन निकष

मुंबई : कायम विनाअनुदानित तत्त्वावरील खासगी माध्यमिक शाळांना अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मूल्यांकन निकष पूर्ण करणाऱ्या शाळांची त्रयस्थ समितीने पाहणी केली होती. त्यानुसार १६२ शाळा अनुदानास पात्र ठरल्या असून, यातील १,२९२ पदे अनुदानास पात्र ठरली.मूल्यांकनाच्या सूत्रानुसार अनुदानास पात्र शाळांचे प्रस्ताव त्रयस्थ समितीकडून तपासून शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी १६२ शाळांना अनुदानास पात्र ठरविण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार १६२ शाळांमधील ४८६ वर्गांसाठी ८१० शिक्षक आणि ४८२ शिक्षकेतर अशा एकूण १,२९२ पदांनुसार या शाळांसाठी अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई विभागातील १४ शाळांचा समावेश आहे.त्रयस्थ समितीकडून ४६२ शाळांपैकी १६२ शाळा अनुदानास पात्र ठरवल्या आहेत. परंतु ही प्रक्रिया यापूर्वी झाली असती तर शाळांना अनुदान मिळण्यात अडचण आली नसती. २० दिवसांवर अर्थसंकल्पीय अधिवेशन आले असताना, या शाळांना निधी कधी मंजूर होणार हा प्रश्नच आहे. त्यामुळे आम्ही शिक्षणमंत्र्यांकडे हा निधी त्वरित मंजूर करण्याची मागणी करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी सांगितले. (प्रतिनिधी)