शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

महाबळेश्वर १५, तर मुंबई २३ अंश! महिन्याच्या शेवटपर्यंत उकाडा कायम राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 6:55 AM

दिवाळीच्या आसपास मुंबईकरांना थंडीसाठीचे अनुकूल हवामान अनुभवता येणार

मुंबई : राज्यात रविवारी सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर १५.७ अंश, तर मुंबईचे किमान तापमन २३.८ अंश एवढे नोंद झाले आहे. मुंबई वगळता राज्यभरात सर्वत्र अवकाळी पावसाचा धिंगाणा सुरू असून, मुंबईत ऑक्टोबर हिटचे चटके बसत आहेत. हा जीव काढणारा उकाडा महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहणार असून, त्यानंतर दिवाळीच्या आसपास मुंबईकरांना थंडीसाठीचे अनुकूल हवामान अनुभवता येणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ, तर विदर्भात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. मराठवाड्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. १८ ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबईचे तापमान तीन अंशांनी घटणारऑक्टोबर हिटचा तडाखा आणखी काही दिवस राहणार आहे. दिवाळीनंतर ऋतुमानात बदल होऊन हवामानात किंचित गारवा येईल. मुंबईत प्रामुख्याने तापमान कमी नोंदविले जात नाही. मात्र, तरीही मुंबई किमान तापमान सरासरी ३ सेल्सिअस अंशानी खाली नोंदविण्यात येईल. दिवाळीनंतर हवामानात घसरण होईल. नाशिक, पुणे येथील किमान तापमानात बऱ्यापैकी घट होईल. हे किमान तापमान १५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येईल, असा अंदाज ‘वेगरीस ऑफ दी वेदर’ या संस्थेने वर्तविला आहे.