शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमध्ये रोज १३ रुग्णांचा मृत्यू

By admin | Updated: June 23, 2014 01:22 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मागील १५ महिन्यांत ८५ हजार ७७७ रुग्णांना भरती करण्यात आले. यातील ५ हजार ९५२ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसाकाठी सरासरी १३ रुग्णांचा मृत्यू होत

१५ महिन्यांत ५,९५२ रुग्णांचा मृत्यूनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मागील १५ महिन्यांत ८५ हजार ७७७ रुग्णांना भरती करण्यात आले. यातील ५ हजार ९५२ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसाकाठी सरासरी १३ रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे या आकडेवारीवरून समोर आले आहे. मध्य भारतातील सर्वात मोठे रु ग्णालय म्हणून मेडिकलचे स्थान आहे. या रुग्णालयात नागपूर, विदर्भ, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आदी राज्यांसह मध्य भारतातूनही हजारोंच्या संख्येने रु ग्ण उपचारासाठी येतात. मेडिकलमध्ये अत्याधुनिक सुविधांसह तज्ज्ञ डॉक्टरांचा भरणा असल्याने, रु ग्णालयात दारिद्र्य रेषेखालील, गरीब व श्रीमंत रु ग्णही मोठ्या प्रमाणात येतात. या रु ग्णांमध्ये वेगवेगळ्या सौम्य व जटील आजाराचे रु ग्ण असतात. तसेच विविध अपघातांमधील सामान्य व गंभीररीत्या जखमी रु ग्णांचे मेडिकलमध्ये प्रमाण जास्त असते. याशिवाय खून, गंभीररीत्या जखमी होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण अधिक असते. विशेष म्हणजे, शहरात खासगी इस्पितळांची संख्या वाढली असतानाही मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. जानेवारी २०१३ ते मार्च २०१४ या १५ महिन्यांत ७ लाख २१ हजार ५४३ रुग्णांनी उपचार घेतला. याच कालावधीत आंतररुग्णांची संख्या ८५ हजार ७७७ रुग्ण एवढी आहे. ही संख्या जवळपास स्थिर असली तरी मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. जानेवारी २०१३ मध्ये ३५० रुग्णांचा मृत्यू झाला, तर मार्च २०१४ मध्ये ३७५ रुग्णांचा मृत्यू झाला. या १५ महिन्याच्या कालावधीत एकूण ५ हजार ९५२ रुग्णांचा मृत्यू झाला. माहिती अधिकारी कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी टाकलेल्या माहितीच्या अधिकारात ही सत्य स्थिती उजेडात आली आहे. मेडिकलमध्ये वाढत्या मृत्यूबाबत एका वरिष्ठ डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, खासगी रुग्णालयात एखादा रुग्ण गंभीर झाल्यास किंवा औषधोपचारासाठी त्याच्याकडील पैसे संपल्यास अशा रुग्णांना थेट मेडिकलमध्ये पाठविले जाते. यात गंभीर रुग्णांची संख्या सर्वाधिक असते. मागील दोन-तीन वर्षांत याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दिवसाला सरासरी १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे.(प्रतिनिधिी)